मायरा वैकुळच्या हिंदी मालिकेच्या सेटवर घुसला बिबट्या
मुंबई, 6 जुलै- माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील छोटी परी म्हणजेच अभिनेत्री मायरा वैकुळ सध्या नीरजा या हिंदी मालिकेत काम करत आहे. ही मायराची पहिलीच मालिका आहे. आता या मालिकेच्या सेटवरुन एक मोठी अपडेट समोर आली आहे. कारण मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना अचानक सेटवर बिबट्या घुसल्याचे समोर आलं आहे.‘नीरजा’च्या सेटवर बिबट्या घुसल्याने गोंधळ उडाला. भीतीमुळे सेटवरील लोकांची अवस्था वाईट झाली. नुकतेच ‘नीरजा’च्या सुरुवातीचे काही भाग कोलकातामध्ये शूट करण्यात आले, त्यानंतर मुंबई फिल्मसिटीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शोचे संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित होते. दरम्यान एक बिबट्या तेथे आला आणि सर्वांची घाबरगुंडी उडाली.मिडीया वृत्तानुसार, नीरजा: एक नई पेहचान सेटच्या बाल्कनीतून बिबट्याने प्रवेश केला. सेटवरून बिबट्याचा व्हिडिओही समोर आला आहे. वाचा- तुमच्या विचारांची पोच…; कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर या मालिकेसाठी उभारण्यात आलेल्या घराच्या छतावर अनेक माकडे पावसामुळे लपून बसले होते. त्यावेळी अचानक एका बिबट्याने माकडांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने छतावर झडप घातली. मात्र तिथे गर्दी पाहून त्याने पळ काढला. पण बिबट्याचा सेटवरील वावर पाहता सेटवरील कलाकारांची तारांबळ उडाली.
मुंबईतील गोरेगाव परिसरात पसरलेल्या जंगलात बिबट्यांसह इतर वन्य प्राणी असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे ते आजूबाजूच्या लोकांना दिसत आहेत.अनेकवेळा वन्य प्राणी सेटवर घुसले आहेत. यावेळीही तेच झाले.