JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मराठी पाऊल पडते कुठे?; 'सनी' चित्रपटाचे शो रद्द झाल्याने ललित प्रभाकर संतापला

मराठी पाऊल पडते कुठे?; 'सनी' चित्रपटाचे शो रद्द झाल्याने ललित प्रभाकर संतापला

अभिनेता ललित प्रभाकर सध्या ‘सनी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सनी हा चित्रपट 18 नोव्हेंबरला रिलीज झाला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला स्क्रिन मिळत नाहीयेत.

जाहिरात

ललित प्रभाकर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 नोव्हेंबर : अभिनेता  ललित प्रभाकर सध्या  ‘सनी’  या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सनी हा चित्रपट 18 नोव्हेंबरला रिलीज झाला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला स्क्रिन मिळत नाहीयेत. त्यामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षकही संताप व्यक्त करत आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपटासाठी प्रेक्षक तिकिट काढत आहेत मात्र शो रद्द केले जात आहेत. त्यामुळे मराठी सिनेमांची गळचेपी होतेय का? हा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. अनेक कलाकार समोर येत मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या वागणूकीविषयी पोस्ट शेअर करत आहेत. अशातच चित्रपटाचा मुख्य अभिनेता ललित प्रभाकरने याविषयी पोस्ट शेअर केलीये. ललित प्रभाकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने शो कॅन्सल होत असल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या पोस्टसोबत ललितने लिहिलं, मराठी पाऊल पडते कुठे?. त्याच्या या पोस्टवर प्रेक्षकांच्या अनेक कमेंट येत असलेल्या पहायला मिळत आहेत. लोक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. आता यावर सरकार काय अॅक्शन घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हेही वाचा - महाराष्ट्रातच मराठी सिनेमांना हक्काचे थिएटर्स,स्क्रीन्स का नाही? सद्यस्थितीवर उत्कर्षचा सवाल ललितशिवाय अभिनेता चिन्नय मांडलेकरनेही याबाबात पोस्ट शेअर केलीये. चिन्मयनेही शो कॅन्सल होत असलेल्या बातम्यांचे स्क्रीनशॉट टाकत संताप व्यक्त केलाय. त्याने पोस्ट शेअर करत म्हटलं, ‘इतके दिवस ते म्हणत होते कि लोकंच येत नाहीत. आता बुकिंग केलेल्या प्रेक्षकांना मेसेज जातायत की तुमचं बुकिंग कॅन्सल पैसे परत घ्या. बनवणाऱ्यांनी चित्रपट बनवला, ज्यांनी पाहिला त्यांना आवडला ही आहे, आणखी लोकांना पाहायचा आहे. मग ही मधली लोकं कोण. काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मराठी चित्रपट सृष्टीतल्या निर्मात्यांची आवर्जून भेट घेतली होती. आता पुन्हा त्यांच्याचकडे हे गाऱ्हाणं मांडावं का?’

दरम्यान, सनी  या सिनेमात घरापासून दूर राहिलेल्या व्यक्तींची कहाणी दाखवण्यात आली आहे. ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. या चित्रपटाच्या प्रोमोलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दर्शवला होता. मात्र आता या चित्रपटासाठी स्क्रीन मिळणं अवघड झाल्याचं पहायला मिळतंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या