JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Laal Kaptan Trailer 2 : दीपक डोबरियालचा अनोखा अवतार, ओळखणंही झालं कठीण

Laal Kaptan Trailer 2 : दीपक डोबरियालचा अनोखा अवतार, ओळखणंही झालं कठीण

दीपक डोबरियाल या सिनेमा एका ट्रॅकरच्या भूमिकेत दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 सप्टेंबर : अभिनेता सैफ अली खान मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिपासून दूर आहे. नुकताच त्याची वेब सीरिज सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन रिलीज झाला. त्यानंतर आता सैफ लाल कप्तान या सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा पहिला ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. त्यानंतर आता या ट्रेलरचा दुसरा भाग नुकताच रिलीज झाला असून यात अभिनेता दीपक डोबरियालचं अनोखं रुप पाहायला मिळत आहे. लाल कप्तानच्या पहिल्या ट्रेलरमध्ये सैफ अली खान खूपच हिंसक रुपात दिसला. क्लोजअप शॉट, कपाळावर राख आणि लाल टीळा, डोळ्यात काजळासोबतच थरकाप उडवणारी दहशत. या सिनेमात एका नागा साधूच्या बदल्याचा प्रवास पाहायला मिळणार आहे. पहिल्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच सैफ घोड्यावर बसून एका माणसाचं प्रेत खेचत नेताना दिसला. त्यानंतर आता दीपक डोबरियालवर दुसऱ्या भागत फोकस करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असतात लता दीदी, कोण करतं त्यांचे ट्वीट घ्या जाणून

दीपक डोबरियाल या सिनेमा एका ट्रॅकरच्या भूमिकेत दिसत आहे. ज्याच्यावर कुत्र्यांप्रमाणे वास घेण्याची असाधारण क्षमता असते. तो एखाद्या गोष्टीचा वास घेऊन त्यापर्यंत पोहोचत असतो. याशिवाय त्याच्या मदतीला दोन मोठे शिकारी कुत्रे सुद्धा असतात. या सिनेमातील दीपकचा अवतार पाहता त्याला ओळखणं सुद्धा खूप कठीण झालं आहे. राखी सावंतनं पहिल्यांदाच शेअर केला पतीचा फोटो, पण त्यातही आहे अनोखा ट्विस्ट

याशिवाय या सिनेमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एका स्पेशल भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तिचा या सिनेमातील लुक रिलीज करण्यात आला. ज्यात ती एका इरानी सुटमध्ये चेहरा एका पारदर्शक कपड्यानं झाकलेल्या अवतारात दिसत आहे. या सिनेमातील सोनाक्षीची नेमकी भूमिका सांगितली गेली नसली तरीही ती या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार असल्याचं सिनेमाच्या दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या

हा सिनेमा येत्या 18 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. सुरुवातीला हा सिनेमा 6 सप्टेंबरला रिलीज होणार होता मात्र नंतर काही कारणास्तव ही डेट बदलण्यात आली. अनुष्का शर्माच्या NH10 चं दिग्दर्शन करणाऱ्या नवदीप सिंह यांनीच हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. तर सिनेमाची निर्मिती आनंद एल राय यांची आहे. सिनेमाच्या कथेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचं आनंद एल राय सांगतात. या सिनेमात सैफ व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, झोया हुसैन, दीपक डोबरियाल आणि मानव विज यांच्या महत्तवाच्या भूमिका आहेत. साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण… ================================================ साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या