JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कुशल बद्रिके दिसणार नव्या भूमिकेत नवीन सिनेमात, शेअर केला ह्यदयस्पर्शी VIDEO

कुशल बद्रिके दिसणार नव्या भूमिकेत नवीन सिनेमात, शेअर केला ह्यदयस्पर्शी VIDEO

कुशलनं नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्यातून त्याने त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे.

जाहिरात

Kushal Badrike

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 फेब्रुवारी- ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे कुशल होय. विनोदाचा बादशाह, कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. अनेकदा तो त्याच्या आगामी नाटकांची, चित्रपटांची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. कुशलनं नुकतीच एक पोस्ट केली आहे.  ज्यातून त्याने त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे. चाहते देखील त्याला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. कुशलने त्याच्या आगामी प्रोजेक्टचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्याच्या आगामी सिनेमाचा आहे. या सिनेमात तो नवीन भूमिकेत दिसणार आहे. त्याने याबद्दल माहिती देत एक इन्स्टा पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, oming with the new film “बाप माणूस” वाचा- कियारा अडवाणीच्या बहिणीला पाहिलंत का? सिद्धार्थची मेहुणी गाजवतेय ‘हे’ क्षेत्र लेकीसाठी तिचा बाबा हा कायमच ‘बापमाणूस’असतो…गोष्ट वडील मुलीच्या अतूट नात्याची , फादर्स डे ला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात …बाप माणूस या सिनेमात पुष्कर जोग, अनुष्का दांडेकर, शुभांगी गोखले कुशल बद्रिके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील सिनेमाची उत्सुता आहे.

संबंधित बातम्या

कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. नेहमी तो भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतो. पांडू सिनेमाच्या सेटवरली देखील त्याने काही व्हिडिओ शेअर केले होते. शिवाय तो चला हला येऊ द्याच्या सेटवरून कधी भाऊ कदम तर कधी श्रेया बुगडेसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे.

कुशल बद्रिके सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतो. ‘पांडू’,’जत्रा’, ‘स्लॅमबूक’, ‘डावपेच’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ अशा अनेक चित्रपटांत त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या