JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Hrithik Roshan : 'हँडसम हंक हृतिक रोशनला पडतंय वडिलांसारखं टक्कल'; 'तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चा

Hrithik Roshan : 'हँडसम हंक हृतिक रोशनला पडतंय वडिलांसारखं टक्कल'; 'तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चा

समोरून दिसणारे हृतिक रोशनचे झुपकेदार केस खोटे; ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

जाहिरात

हृतिक रोशन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 ऑक्टोबर : बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन त्याच्या किलर लूक आणि दमदार अभिनयामुळे करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. सुपरस्टार हृतिक रोशन ला चाहत्यांनी ग्रीक गॉड म्हणूनही संबोधले आहे. अशा स्थितीत हृतिक रोशनच्या लूकवर कुणी प्रश्न उपस्थित केला तर चाहत्यांचं  मन दुखावलं जाईल हे  उघड आहे. आता कमाल आर खाननेही असेच काहीसे केले आहे. माजी बिग बॉस स्पर्धक आणि यूट्यूबर कमाल आर खान उर्फ ​​केआरके, जो फिल्म स्टार्सला  ट्रोल करण्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याने हृतिक रोशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हृतिक रोशनच्या मागे डोक्यावरचे केस दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना केआरकेने हृतिक रोशनच्या ‘टक्कलपणा’ची खिल्ली उडवली आहे. केआरकेने ट्विटरवर  हृतिक रोशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे आणि मेकअप आर्टिस्ट विजय पालांडे यांच्या एंगेजमेंटचा आहे. ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी सुपरस्टार हृतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत पोहोचला होता. या पार्टीदरम्यान हृतिक रोशन विजय पालांडे आणि भाग्यश्री मोटे यांना त्यांच्या एंगेजमेंटबद्दल अभिनंदन करताना दिसला. जिथे कॅमेऱ्यात तो कैद झाला. कॅमेरात त्याच्या मागच्या बाजूला डोक्यावर टक्कल दिसत होते. हा व्हिडिओ शेअर करताना केआरकेने लिहिले की, ‘जेव्हा हृतिक रोशन हेअर पॅच घालायला विसरला.’ हेही वाचा - Bhagyashree Mote: मराठमोळ्या भाग्यश्रीच्या साखरपुड्यात गर्लफ्रेंडसोबत हृतिकची हजेरी; समोर आलं कनेक्शन बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनचा हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. हृतिक रोशनचा हा व्हिडिओ पाहून एका इंटरनेट यूजरने लिहिले की, ‘तो 48 वर्षांचा आहे’. तर एका इंटरनेट यूजरने याउलट केरेकवर निशाणा साधला आणि ‘तुम्ही हेअर पॅचही लावा’ असे म्हटले आहे. तर एका इंटरनेट युजरने लिहिले की, ‘त्याने ते नीट घातलेले नाही.’ लोकांच्या या टिप्पण्या तुम्ही येथे पाहू शकता.

संबंधित बातम्या

सुपरस्टार हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलताना, सुपरस्टार हृतिक रोशन नुकताच त्याच्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. या चित्रपटात सैफ अली खानही मुख्य भूमिकेत  दिसला होता. या चित्रपटानंतर हृतिक रोशन त्याच्या पुढच्या चित्रपटात व्यस्त झाला आहे. तो लवकरच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण हृतिक रोशनसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या