JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला करायचंय स्वयंवर; कार्तिक आर्यन ते विजय देवरकोंडा होणार सहभागी?

'या' बॉलिवूड अभिनेत्रीला करायचंय स्वयंवर; कार्तिक आर्यन ते विजय देवरकोंडा होणार सहभागी?

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या अगदी बिनधास्तपणे आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत मत व्यक्त करत असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 ऑगस्ट-   बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या अगदी बिनधास्तपणे आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत मत व्यक्त करत असतात. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनन होय. क्रिती नेहमीच आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा आणि आपल्या अपडेट्स देण्याचा प्रयत्न करत असते. चाहत्यांनाही अभिनेत्रीबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला आवडते. गेल्या अनेक दिवसांपासून क्रिती आणि कार्तिक आर्यन एकेमकांना डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान आता एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने आपल्या स्वयंवराबाबत भाष्य केलं आहे. पाहूया अभिनेत्रीने नेमकं काय म्हटलंय. क्रिती सेननने नुकतंच रोपसोच्या एका लाईव्ह शोदरम्यान मनसोक्त संवाद साधला. यावेळी अभिनेत्रीने आपल्या खाजगी आयुष्याबाबत अनेक गोष्टी शेअर केल्या. तसेच लग्नाबाबत बोलताना अभिनेत्रीनं सांगितलं की आपल्याला आपला स्वयंवर व्हावा असं वाटतं. इतकंच नव्हे तर क्रितीने आपल्या स्वयंवरमध्ये आपल्याला कोणकोणते कलाकार हवेत याबाबतही इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने अनेक कलाकारांची नावे घेतली आहेत. ज्यामध्ये साऊथ सुपरस्टारचादेखील समावेश आहे.

यावेळी बोलताना क्रिती सेननने सांगितलं की, ‘मला वाटतं माझा स्वयंवर व्हावा. आणि त्यामध्ये मला विजय देवरकोंडाचा समावेश असावा असं मनापासून वाटतं. विजय देवरकोंडाबाबत बोलताना क्रिती म्हणाली, मला तो प्रचंड आवडतो. तो समजूतदार व्यक्ती वाटतो. तो शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. सोबतच अभिनेत्रीने म्हंटल यामध्ये आदित्य रॉय कपूर आणि कार्तिक आर्यन यांचाही समावेश असावा. आणखी कुणी सिंगल आहे का? असा मजेशीर सवालही यावेळी क्रितीने केला. **(हे वाचा:** श्रद्धा कपूर-टायगर श्रॉफचा पुन्हा पडद्यावर रोमान्स; अभिनेत्रीच्या हाती लागला आणखी एक मोठा सिनेमा? ) सोबतच क्रिती सेनने आपल्या हॉलिवूड क्रशबाबतही सांगितलं. क्रिती सेननला हॉलिवूड अभिनेता रयान गोसलिंग हा प्रचंड पसंत आहे. अभिनेत्रीला त्याच्यासोबत काम करण्याचीदेखील इच्छा आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीला या अभिनेत्याचा आपल्या स्वयंवरमध्येही समावेश असावा असं वाटतं. कामाबाबत सांगायचं झालं तर, क्रितीजवळ अनेक मोठमोठे प्रोजेक्टस आहेत. आगामी काळात ती ‘आदिपुरुष’ या बहुचर्चित चित्रपटातही झळकणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या