JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / KBC 14 मध्ये कोल्हापुरी मिरचीचा ठसका; कविता चावला बनली पहिली करोडपती

KBC 14 मध्ये कोल्हापुरी मिरचीचा ठसका; कविता चावला बनली पहिली करोडपती

सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणारा रिअॅलिटी क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ भारतातील अनेकांचा आवडता शो आहे. सध्या या शोचा चौदावा सीझन सुरु असून शोदरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 सप्टेंबर : सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणारा रिअॅलिटी क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ भारतातील अनेकांचा आवडता शो आहे. सध्या या शोचा चौदावा सीझन सुरु असून शोदरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच कौन बनेगा करोडपती सीझन 14 ला पहिला करोडपती मिळाला आहे. या सीझनच्या पहिल्या करोडपतीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरात राहणाऱ्या कविता चावलाने एक कोटी रुपये जिंकले आहेत. या सीझनमध्ये 1 कोटी कमावणारी पहिलीच स्पर्धक कविता चावला ठरली आहे. यापहिलेही कविता यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभाग नोंदवला होता. मात्र त्या हॉटसीटपर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या. पण त्या हार न मानता पुन्हा जुद्दीने शोमध्ये परतल्या. 45 वर्षीय कविताने 1 कोटी रुपये जिंकले आहेत मात्र त्या 7 कोटी रुपयांपर्यंत पोहचल्या का नाही हे अद्याप अस्पष्टच आहे. हेही वाचा - एअरपोर्टवर चाहत्याने केलं असं काही की Aryan Khan नेही केला सलाम कविता तिचा मुलगा विवेकसोबत शोमध्ये सहभागी झाली होती. येत्या सोमवार आणि मंगळवारी हा भाग सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक हा भाग पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत. गतवर्षीच्या सीझनमध्येही अनेक महिला करोडपती झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक वर्षी अनेक स्पर्धक करोडपती बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.

दरम्यान, ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा प्रत्येक सीझन खूप लोकप्रिय ठरतो. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या चौदाव्या सीझनलाही प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत असल्याचं पहायला मिळतंय. प्रत्येक सीझनमध्ये सहभागी होणारे स्पर्धक खूप उत्साही असतात. यावेळीही ‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी यावेळीही बिग बी अमिताभ बच्चनच सांभाळत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या