'खतरों के खिलाडी' चा पहिला फायनलिस्ट बनला मराठमोळा शिव ठाकरे?
मुंबई, 26 जून : बिग बॉसचा 16 वा सीजन MC Stan जरी जिंकला असला तरी लोकांचे मन जिंकण्यात मराठमोळ शिव ठाकरे यशस्वी झाला. बिग बॉसचं घर गाजवल्यानंतर शिव ठाकरेला खतरो के खिलाडीची ऑफर मिळाली. याशोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक दक्षिण आफ्रिकेत शोचं शुटिंग करत आहेत. सहभागी स्पर्धक सोशल मीडियावर तिथले फोटो व व्हिडीओ शेअर करत आहेत. अशातच या शोबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खतरो के खिलाडी या शोमध्ये मराठमोळा शिव ठाकरे सहभागी झाला आहे. ‘बिग बॉस 16’ चा उपविजेता शिव शोचा पहिला फायनलिस्ट बनल्याची माहिती समोर आली आहे. ‘टेली चक्कर’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शिव ठाकरे या शोचा पहिला फायनलिस्ट आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, शिव ठाकरे पहिला फायनलिस्ट असेल तर त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. वाचा- पत्रिका छापल्या,नवरीही तयार पण ‘त्या’ कारणामुळं मनोज मुंतशिरचं मोडलं लग्न बिग बॉस 16 च्या वेळेपासून शिवला खतरों के खिलाडी 13 मध्ये जायचे होते. पुढे बिग बॉसच्या घरात असतानाच रोहित शेट्टीने शिवला खतरों के खिलाडी 13 ची ऑफर दिली.शिवने सुद्धा बिग बॉस 16 नंतर लगेचच खतरों के खिलाडी 13 ची तयारी जोमाने सुरू केली. बिग बॉसच्या घरात देखील तो विजेतेपदाचा प्रमुख दावेदार होता. आता देखील खतरो के खिलाडीच्या यंदाच्या सीजनचा शिव ठाकरेच विजेता होईल अशी चर्चा रंगलेली आहे.
‘खतरों के खिलाडी’चे 13 वे पर्व दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करत आहे. या शोमध्ये शिव ठाकरेसह ऐश्वर्या शर्मा, डेझी शाह, अर्जित तनेजा, शिझान खानसह अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत.
शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी’चा विजेता आहे आणि तो ‘बिग बॉस 16 ’ चा उपविजेता आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. ‘रोडीज’ व ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेला शिव तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. शोमध्ये त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाने चाहत्यांची मनं जिंकली. आता देखील सोशल मीडियावर शिवचा मोठा चाहता वर्ग आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून शिव ठाकरेला अनेक नवीन प्रोजेक्ट मिळाले आहेत.