JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'खतरों के खिलाडी' फेम शिवीन नारंग हॉस्पिटलमध्ये, वाचा काय आहे कारण

'खतरों के खिलाडी' फेम शिवीन नारंग हॉस्पिटलमध्ये, वाचा काय आहे कारण

काही दिवसांपूर्वी शिवीन नारंग मुंबईमध्ये राहत असलेली बिल्डिंग कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता सील करण्यात आली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मे : कोरोना व्हायरसनं सध्या मुंबईमध्ये अक्षरशः थैमान घातलं असताना अभिनेता शिवीन नारंगला अचानकपणे हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं आहे. काही दिवसांपूर्वी शिवीन नारंग मुंबईमध्ये राहत असलेली बिल्डिंग कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता सील करण्यात आली होती. अशात शिवीनला हॉस्पिलटलमध्ये दाखल करण्यात आल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र त्याला हॉस्पिटलमध्ये का भरती करावं लागलं याचं कारण स्पष्ट झालं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, शिवीनच्या जवळच्या सुत्रांनी सांगितलं की, घरी एका काचेच्या टेबलवर पडल्यानं त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. ज्यामुळे त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर आहे. पण त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. कारण जानेवारी महिन्यात ‘बेहद 2’ या मालिकेचं शूटिंग करत असताना शिवीनच्या या हाता फ्रॅक्चर झालं होतं. ऋषी कपूर यांच्या अस्थि विसर्जनानंतर नीतू कपूर यांनी शेअर केली भावनिक पोस्ट

काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्यानंतर शिवीनला घरी सोडण्यात येईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कोरोना पेशंट सापडल्यानं शिवीन राहत असलेली बिल्डिंग सील करण्यात आली होती. शिवीन सध्या मुंबईमध्ये एकटा राहत आहे. त्याचे आई-वडील लॉकडाऊनमुळे दुसरीकडे अडकले आहेत.

शिवीन नारंग ‘बेहद 2’ या मालिकेमुळे बराच चर्चेत राहिला होता. मात्र लॉकडाऊनमुळे सोनी टीव्हीनं ही मालिका अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत शिवीन अभिनेत्री जेनिफर विंगेटच्या अपोझिट दिसला होता. याशिवाय त्यानं यंदाच्या खतरों के खिलाडीच्या सीझनमध्येही भाग घेतला होता. त्याचा हा प्रवास सुद्धा चर्चेत राहिला होता. एवढंच नाही तर या दरम्यान तो अभिनेत्री तेजस्विनी प्रकाशला डेट करत असल्याचं बोललं गेलं होतं. मात्र नंतर या केवळ अफवा असल्याचं स्वतः तेजस्विनीनं स्पष्ट केलं. (संपादन- मेघा जेठे) हिना खानने केली ‘लॉकडाऊन देवतां’ची पूजा, VIDEO पाहून हसू नाही आवरणार आराध्यानं असे मानले कोरोना योद्ध्यांचे आभार, ऐश्वर्या रायने शेअर केला PHOTO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या