JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'एक अव्वल कलाकार..' दिग्दर्शक केदार शिंदेंची राज ठाकरेंसाठीची पोस्ट चर्चेत

'एक अव्वल कलाकार..' दिग्दर्शक केदार शिंदेंची राज ठाकरेंसाठीची पोस्ट चर्चेत

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्यासाठी केदार शिंदे यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मे- दिग्दर्शक केदार शिंदे शाहीर साबळे ( shahir sable ) यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ ( maharashtra shahir teaser release ) सिनेमा घेऊन येत आहेत. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्यासाठी केदार शिंदे यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. सध्या त्यांची पोस्ट सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. केदार शिंदे यांनी त्यांच्या इन्स्टाला र एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत राज ठाकरे शाहीर साबळे यांच्या पोस्टरकडे पाहत असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना केदार शिंदे यांनी म्हटलं आहे की, आपल्या कलाकृतीकडे पाहणारा एक अव्वल कलाकार… मनस्वी आनंद.’’ केदार शिंदे यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. वाचा- ‘…म्हणजे काय दुधावरची साय’ रूपाली भोसलेची खास व्यक्तीसाठी खास पोस्ट शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना अभिवादन म्हणून त्यांच्या जीवनकार्याचा वेध ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलं असून पटकथा आणि संवाद प्रतिमा कुलकर्णी यांचे आहेत. शिवाय अजय- अतुल या जोडीचं संगीत या सिनेमाला लाभलं आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमात शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी**(Ankush Chaudhari)** दिसणार आहे.

संबंधित बातम्या

शाहीर साबळे या अलौकिक व्यक्तिमत्त्वावर जीवनपट साकारला जाणार आहे. केदार शिंदे या चित्रपटावर गेली अडीच वर्षं काम करत आहेत. ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘जेजुरीच्या खंडेराया’, ‘या गो दांड्यावरून’ ही शाहिरांची अजरामर गाणी चित्रपटात असणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या