JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / KBC 14 : स्पर्धकाची पत्नी म्हणाली अमिताभ बच्चनचे चित्रपट 'फालतू'; ऐकून बिग बींनी मारला कपाळावर हात

KBC 14 : स्पर्धकाची पत्नी म्हणाली अमिताभ बच्चनचे चित्रपट 'फालतू'; ऐकून बिग बींनी मारला कपाळावर हात

कौन बनेगा करोडपती हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. नुकतंच यात सहभागी झालेल्या स्पर्धकाने अमिताभ यांच्या चित्रपटाबाबत केलेला खुलासा ऐकून अमिताभ यांनी डोक्यालाच हात लावला.

जाहिरात

kaun banega crorepati 14

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 सप्टेंबर : कौन बनेगा करोडपती हा टेलिव्हिजनचा सर्वात प्रसिद्ध शो म्हणून ओळखला जातो. या शोचा सध्या  14 वा सीझन सुरु आहे.  दरवेळेस प्रमाणे याही सिझनला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. छोट्या पडद्यावरून अनेक रिअ‍ॅलिटी शो प्रसारित होत असतात. हा शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन तर करत आहेच शिवाय त्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला वाव देत आहेत. बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन सादर करत असलेल्या या शोची प्रचंड लोकप्रियता आहे. या मंचावर दर आठवड्याला मजेदार स्पर्धक येत असतात. जे नंतर चर्चेचा विषय ठरतात. आताही या मंचावर अमिताभ बच्चन यांच्यासोबत असाच मजेशीर प्रकार घडला आहे. कौन बनेगा करोडपती शोच्या या सीझनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक त्यांच्या खेळातून लोकांची मने जिंकत आहेत. पण त्याचबरोबर त्यांचे मजेदार किस्सेसुद्धा चांगलेच लोकप्रिय होतात. या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाने असा काही खुलासा केला कि अमिताभ बच्चन कदाचित त्याला आयुष्यभर विसरणार नाहीत.

संबंधित बातम्या

शोच्या नवीन प्रोमोमध्ये हॉट सीटवर बसलेला स्पर्धक म्हणतो कि, ‘सर बायकोची तक्रार आहे, ती म्हणते की मी तिच्यावर प्रेम करत नाही.’ यावर अमिताभने कारण विचारले, ज्याचे कारण देताना स्पर्धक कृष्णा दास म्हणतो कि, ‘सर, मी तुमचा चित्रपट पाहतो तेव्हा बायको म्हणते तुम्ही काय फालतू पिक्चर बघत आहात’. हे ऐकताच अमिताभ बच्चन यांना धक्काच बसला आणि त्यांनी कपाळाला हात लावला. हेही वाचा - Prasad Oak Exclusive : ‘पुस्तकाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही’; ‘माझा आनंद’बाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य पुढे तो स्पर्धक म्हणतो कि, ‘पण मी त्या चित्रपटाचे नाव सांगणार नाही’, त्यावर अमिताभ बच्चन यांनी मजेशीर उत्तर दिले. ते म्हणतात की, ‘आधी मला ही गोष्ट पचवू द्या.’ या मजेशीर प्रोमोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याला खूप पसंती दिली जात आहे. ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये प्रत्येक वेळी प्रमाणेच यावेळीही अनेक मजेदार स्पर्धक येत आहेत जे उत्तम खेळ खेळत आहेत. मात्र, अद्याप या कार्यक्रमात कोणीही करोडपती बनू शकलेले नाही. अनेक स्पर्धकांचा प्रश्न 1 कोटीपर्यंत पोहोचला असला तरी 1 कोटीच्या प्रश्नाचे अचूक उत्तर कोणीही देऊ शकलेले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या