मुंबई, 26ऑक्टोबर- रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) अक्षय कुमार आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) स्टारर ‘सूर्यवंशी’(Sooryvanshi) हा चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट आणि खुद्द दिग्दर्शक रोहित शेट्टी देखील युद्धपातळीवर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतले आहेत. अलीकडेच रोहित शेट्टी आणि कतरिना कैफ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणवीर सिंहचा**(Ranvir Singh)** शो ‘द बिग पिक्चर’(The Big Picture) मध्ये पोहोचले होते. यादरम्यान सर्वांनी मिळून शोमध्ये खूप धमाल केली. मात्र, अक्षय कुमार पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने शोमध्ये येऊ शकला नाही.तर शोमध्ये कतरिनाने चक्क मराठीत रणवीरची बोलती बंद केली आहे.
‘द बिग पिक्चर’चा हा एपिसोड या वीकेंडला दाखवला जाणार आहे. या एपिसोडचा पहिला प्रोमोही समोर आला आहे. प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. या प्रोमोच्या अगदी सुरुवातीला, कतरिना कैफ रोहित शेट्टीला सांगते की तिने एक महिला केंद्रित पोलिस चित्रपट बनवला पाहिजे. यानंतर, ती खाकी टोपी घालून फिरते आणि दाखवते की ती त्या चित्रपटात परिपूर्ण दिसेल. कतरिना कैफचा हा दबंग अवतार सर्वांनाच पसंत पडतो. मात्र त्यांनतर कतरिना सर्वांनाच चकित करते. कारण कतरिना चक्क मराठीत धसकेबाज डायलॉग म्हणते. त्याचवेळी रणवीर सिंगकडे जाऊन कतरिना कैफ सिंघम चित्रपटाचा डायलॉग बोलते, ‘मेरे जमीर में दम है इसलिए मेरी जरुरतें कम है’. तेव्हा यावर रणवीर सिंह बाजीराव मस्तानीमधील ‘बाजीराव मैंने बहुत देखे हैं, लेकिन तुझ जैसा मैंने आज तक नहीं देखा.’ हा डायलॉग म्हणते. खरी मजा यानंतर येते. रणवीरच्या या डायलॉगवर कतरिना कैफने अत्यंत धमाकेदार उत्तर देताना मराठीत म्हटलंय, ‘भाऊ, जे मला नाय महिती ते सांगा’ कतरिनाच्या या डायलॉगला रणवीरकडे उत्तरच नसतं. रोहित शेट्टी आणि रणवीर सह चाहतेही कतरिनाच्या या डायलॉगवर फिदा होतात. **(हे वाचा:** महेश मांजरेकरांनी कॅन्सरशी लढा देत केली Antimची शूटिंग;सलमानने सांगितलं…. ) कतरिना कैफ सूर्यवंशीमध्ये दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या जोडीने यापूर्वीही अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.दोघांनाही एकत्र खूप पसंत केलं जातं. बऱ्याच काळानंतर दोघेही सूर्यवंशीमध्ये पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर ‘आयला रे आला’ या चित्रपटाचं पहिलं गाणंही रिलीज झालं आहे. लोकांनाही हे गाणं खूप आवडलं आहे.