JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रणबीरशी झालेल्या ब्रेकअपवर कतरिना म्हणाली, ‘मला मित्रांपेक्षा आता शत्रूवर जास्त विश्वास आहे’

रणबीरशी झालेल्या ब्रेकअपवर कतरिना म्हणाली, ‘मला मित्रांपेक्षा आता शत्रूवर जास्त विश्वास आहे’

रिलेशनशिपबद्दल बोलताना कतरिना म्हणाली की, ‘मला स्वतःला घडवण्यासाठी आधी स्वतःला पूरतं बदलावं लागलं. माझ्यासोबत जे काही झालं, त्यातल्या माझ्या भावनांची जबाबदारी मी घेऊ शकत होते.'

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 एप्रिल- सध्या बॉलिवूडची ‘चिकनी चमेली’ अर्थात कतरिना कैफ तिच्या आगामी भारत सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सिनेमात सलमान- कतरिना जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका मुलाखती दरम्यान, कतरिनाने तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरबद्दल आणि ब्रेकअपबद्दल पहिल्यांदा खुलासा केला.

हे तर साऱ्यांनाच माहीत आहे की, रणबीर सध्या आलिया भट्टला डेट करत आहे. आलियाला डेट करण्याआधी रणबीर आणि कतरिना एक दोन नव्हे तर तब्बल सहा वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघं लवकरच लग्न करण्याच्या चर्चा असताना २०१६ मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं आणि त्यानंतर दोघांनी मागे वळून पाहिलं नाही. आता तीन वर्षांनंतर कतरिना पहिल्यांदा ब्रेकअपवर बोलली. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत कतरिना म्हणाली की, ‘मी जे काम करते ते माझ्या खासगी आयुष्यात आलेल्या अनुभवांशी जोडलेलं असतं. मला जी व्यक्तिरेखा दिली जाते, त्या व्यक्तिरेखेशी जुळून घेण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. जे मी पाहिलंय… ऐकलंय… किंवा अनुभवलंय ते सगळं त्या व्यक्तिरेखेत टाकण्याचा माझा प्रयत्न असतो.’ झीरो सिनेमात ब्रेकअपनंतर कतरिना दारुच्या आहारी गेलेली दाखवण्यात आली आहे.

जाहिरात

…म्हणून मतदानासाठी शाहरुख पाच वर्षाच्या अब्रामला मुद्दाम घेऊन गेला रिलेशनशिपबद्दल बोलताना कतरिना म्हणाली की, ‘मला स्वतःला घडवण्यासाठी आधी स्वतःला पूरतं बदलावं लागलं. माझ्यासोबत जे काही झालं, त्यातल्या माझ्या भावनांची जबाबदारी मी घेऊ शकत होते. मी जे काही करू शकत होते आणि त्याला चांगलं करण्यासाठी म जे काही करू शकत होते त्याचाही स्वीकार केला. ज्या गोष्टींसाठी मी जबाबदार नाही ती माझी चिंता नाही. माझी आई मला म्हणायची की, मी ज्या समस्येला तोंड देतेय तीच सम्या इतर अनेक महिला आणि मुलींना आहे. तुम्हाला वाटत असतं की तुम्ही एकटे आहात. पण तुम्ही एकटे नसता.’ दीपिकानं नाकारलेले सलमानचे ‘हे’ सिनेमे ठरले सुपरहिट

जाहिरात

कतरिनामे पुढे कोणाचंही नाव न घेता म्हटलं की, ‘कोणीही असो, जुन्या गोष्टींबद्दल माझ्या मनात कोणतीच कटूता नाही. मला नाही वाटत कोणी माझं मन दुखावलं. सर्व तुमच्यासाठी चांगलंच करण्याचा प्रयत्न करत असतात. पण अनेकदा स्वतःसाठी सर्वोत्कृष्ट करण्याच्या प्रवासात तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता. मला मित्रांपेक्षा शत्रूवर जास्त विश्वास आहे.’ कॅन्सर फ्री झाले ऋषी कपूर? भाऊ रणधीर कपूर यांनी केला खुलासा खासगी आयुष्यात जरी कतरिना आणि रणबीर यांचे मार्ग वेगळे झाले असले तरी सिनेसृष्टीत अनेक कार्यक्रमात दोघं समोरा समोर येतात. कतरिनाच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर सलमान खानसोबतच्या ‘भारत’ सिनेमात ती दिसणार आहे. येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘सूर्यवंशी’ सिनेमात ती पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. कोणकोणत्या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क पाहा SPECIAL REPORT

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या