JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Siddhaanth Vir Surryavanshi Death: सलमानच्या बॉडिडबलनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्याचा जीम वर्कआऊट दरम्यान मृत्यू

Siddhaanth Vir Surryavanshi Death: सलमानच्या बॉडिडबलनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्याचा जीम वर्कआऊट दरम्यान मृत्यू

कसोटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता सिद्धांत सूर्यवंशीचा मृत्यू झाला आहे. जीममध्ये वर्कआऊट दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं आहे.

जाहिरात

सिद्धांत सूर्यवंशी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  11 नोव्हेंबर : काही दिवसांआधीच कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं जीममध्ये वर्क आऊट करत असताना निधन झालं. त्यानंतर अभिनेता सलमान खानच्या बॉडी डबलचाही जीम वर्कआऊटनंतर मृत्यू झाला. आता टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी यांचं आज सकाळी निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, जीममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक तो खाली कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं मृत्यू झालाचं सांगण्यात आलं.  अभिनेता सिद्धांत हा 46 वर्षांचा होता. त्याच्या मृत्यूपश्चात त्याची पत्नी आणि दोन मुलं आहेत. सिद्धांतचं खरं नाव हे आनंद सूर्यवंशी असं आहे. त्यानं काही दिवसांआधीच त्याचं नावं सिद्धांत सूर्यवंशी असं केलं होतं. अभिनेता जय भानुशालीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिद्धांतच्या निधनाची माहिती दिली.  सिद्धांतचा फोटो शेअर करत भाई तू आम्हाला सोडून फार लवकर निघून गेलास असं म्हटलं आहे. मला आमच्या एका कॉमन मित्राकडून सिद्धांतबद्दल कळलं. जीममध्ये वर्कआऊट करताना त्याला हृदयविकाराचा झटका आला असं त्यानं सांगिलतं. अशी माहिती जय भानुशानीलं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली. हेही वाचा - हार्ट अटॅक येण्याआधी शरिरात कोणती लक्षणे दिसतात? जाणून घ्या

संबंधित बातम्या

अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी हा हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा होता. कुसूम, कसोटी जिंदगी की सारख्या हिट मालिकेत सिद्धांतनं काम केलं आहे.  त्याचप्रमाणे सुफियाना इश्क मेरा, जिद्दी दिल मानेना, सात फेरे सलोनी का सफर,  क्यू रिश्ते मे कट्टी बट्टी या त्याच्या प्रसिद्ध टेलिव्हिजन शोमध्ये सिद्धांतनं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

सिद्धार्थ सूर्यवंशीनं दोन लग्न केलं. त्याचं पहिलं लग्न इरा चौधरीबरोबर झालं होतं. इरा मीडिया फिल्ममध्ये काम करत होती. पहिल्या पत्नीपासून सिद्धांतला दीजा ही मुलगी आहे. त्यानंतर सिद्धांतनं मॉडल एलिसिया राऊतबरोबर दुसरं लग्न केलं.  एलिसियापासून सिद्धांतला मुलगा आहे. सिद्धांत पत्नीबरोबर मॉडल्सना ट्रेनिंग देण्याचं काम करत होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या