मुंबई, 20 मार्च : चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेला कोरोना व्हायरस (Coronavirus) आज जगभरात पसरला आहे. भारतात या व्हायरसचे जवळपास 170 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 4 लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. या व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पंतप्रधान मोदी यांनी यासाठी 22 मार्चला जनाता कर्फ्यूची हाक दिली आहे. पीएम मोदींच्या या अपीलनंतर कार्तिक आर्यनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेता कार्तिक आर्यननं पीएम मोदींच्या जनता कर्फ्यूच्या हाकेनंतर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो एक मोठा डायलॉग बोलताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमधून त्यानं मोनोलॉगच्या माध्यमातून कोरोना व्हायरसबाबत एक चांगला मेसेज दिला आहे. Coronavirus मुळे 68 वर्षांपूर्वीचं प्रेमगीत झालं व्हायरल, VIDEO पाहिलात का? कार्तिकनं त्याच्या इन्स्टाग्रामवर 2 मिनिटं 24 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सर्वांना काही दिवस घरात राहण्याचा आणि बाहेरच्या जगाशी बाहेरच्या जगापासून शक्यतो दूर राहण्याविषयी सांगताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो लोकांवर काहीसा रागवलेला दिसत आहे. कारण सध्या भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाही भारतीय या गोष्टीला गंभीरपणे घेत नाही आहेत. लादेन सुद्धा होता अलका याग्निक यांचा फॅन, घरात सापडल्या होत्या गाण्यांच्या सीडी
हा व्हिडीओ शेअर करताना कार्तिकनं लिहिलं, ‘कोरोना स्टॉप करो ना. माझ्या स्टाइलमध्ये माझी विनंती. आतापर्यंत सोशल डिस्टेंसिंग हा एकमात्र उपाय आहे. नरेंद्र मोदीजी आम्ही तुमच्यासोबत आहोत सर…’ या व्हिडीओमध्ये कार्तिकनं लोकांना मेसेज दिला आहे की, कोरोनाला मस्करी न समजता आता तरी गंभीरपणे घ्या. जी चूक इतर देशांनी केली आहे ती आपण करु नये. जास्तीत जास्त वेळ घरी राहा. जर स्वतःची काळजी आपण घेतली तर आपण या व्हायरसला नक्कीच हरवू शकतो. संजय कपूरनं शेअर केले लेकीचे ग्लॅमरस Photo, पाहताना हटणार नाही नजर कार्तिक आर्यनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ युजर्सच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. कोरोनाचा प्रभाव बॉलिवूडकरांवरही पडला आहे. अनेक कलाकार शूटिंग थांबवून घरी राहिले आहेत आणि आपल्या चाहत्यांनाही त्यांनी या व्हायसरपासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यास सांगितलं आहे.