JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कार्तिक आर्यनला पकडावे लागले दीपिकाचे पाय, असं झालं तरी काय; पाहा VIDEO

कार्तिक आर्यनला पकडावे लागले दीपिकाचे पाय, असं झालं तरी काय; पाहा VIDEO

असं काय झालं की कार्तिकाला दीपिकाचे पाय धरावे लागले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 डिसेंबर : अभिनेता कार्तिक आर्यन याचा सिनेमा पति पत्नी और वो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पार्टी साँग धीमे धीमे रिलीज झालं अणि मागच्या काही दिवसांपासून हे गाणं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी या गाण्यावर डान्स करत त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इतकंच नाही तर अभिनेत्री दीपिका पदुकोणलाही या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही आणि काही दिवसांपूर्वी कार्तिकडे तिनं या डान्स स्टेप शिकण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तिची ही इच्छा कार्तिकनं पूर्ण तर केली पण यावेळी असं काय झालं की कार्तिकाला दीपिकाचे पाय धरावे लागले. अभिनेत्री दीपिका पदुकोण कार्तिकच्या धीमे-धीमे गाण्यानं एवढी इंप्रेस झाली की तिनं तिच्या इन्सटाग्रामवर लिहिलं, कार्तिक आर्यन तू मला धीमे धीमे गाण्याच्या डान्स स्टेप शिकवशील आहे. मला सुद्धा # धीमे धीमे चॅलेंज पूर्ण करायचं आहे. वेब सीरिजमध्ये श्वेता तिवारीचा BOLD अवतार, सोशल मीडियावर Video Viral दीपिकानं इन्स्टाग्राम स्टोरीवर कार्तिक आर्यनला केलेली ही रिक्वेस्ट लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर कार्तिकनंही दीपिकाला उत्तर दिलं होतं, कार्तिकनं दीपिकाची रिक्वेस्ट स्वीकारली आणि त्यानंतर त्यानं लिहिलं, ‘नक्कीच तु लगेच शिकशील कधी तेवढं सांग’ कार्तिक आर्यननं दीपिकाची रिक्वेस्ट मान्य केल्यानंतर दीपिकाला तो डान्स स्टेप कधी शिकवणार याकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या होत्या. पण आज या सर्वांची प्रतिक्षा संपली. पहिल्या पत्नीला न सांगताच उदित नारायण यांनी केलं होतं दुसरं लग्न आणि…

रविवारी कार्तिक आणि दीपिका मुंबई एअरपोर्टवर हे दोघं स्पॉट झाले. यावेळी त्या दोघांनी खूप गप्पा मारल्या. यावेळी दीपिका पुन्हा एकदा कार्तिकला डान्स स्टेप शिकवण्यासाठी विनंती करताना दिसली आणि कार्तिकनंही दीपिकाला डान्स स्टेप शिकवल्या.

कार्तिकनं यावेळी ब्लूटूथ स्पीकर मागवला आणि त्यावर धीमे-धीमे गाणं सुरू करत दीपिकाला डान्स स्टेप शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला दीपिकाला या स्टेप समजत नव्हत्या. मग कार्तिकनं तिचे पाय पकडून तिला स्टेप शिकवल्या.

जाहिरात

यानंतर काही क्षणातच दीपिका कार्तिकसोबत धीमे-धीमे गाण्यावर थिरकली. तिनं काही वेळातच अगदी परफेक्ट डान्स स्टेप शिकल्या. ‘चुलबुली गर्ल’ आलिया कसं ठेवते स्वतःला फिट, हे 2 पदार्थ आहेत Weak Point

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या