कार्तिक आर्यन, अक्षय कुमार
मुंबई, 12 नोव्हेंबर : अभिनेता अक्षय कुमार च्या ‘हेरी फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे चाहते बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. अशातच या चित्रपटाविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ‘हेरा फेरी 3’ या आयकॉनिक चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन ची एन्ट्री होणार असल्यातं समोर आलं आहे. त्यामुळे कार्तिक आर्यन पुन्हा अक्षय कुमारला रिप्लेस करणार की काय? अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ‘हेरा फेरी 3 ची घोषणा यापूर्वी अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्यासोबत करण्यात आली होती. पण अनेक कारणांमुळे हा चित्रपट मागे पडला. अलीकडेच, पिंकविलाने विशेष वृत्त दिले होते की अक्षयने हेरा फेरी, वेलकम आणि आवारा पागल दीवाना या तीन फ्रँचायझींमधून माघार घेतली आहे. परेश रावल, ज्यांनी हेरा फेरी फ्रँचायझीमध्ये बाबू भैय्याची भूमिका साकारली होती, त्यांनी ट्विटरवर तिसऱ्या भागासाठी कार्तिक येत असल्याची पुष्टी केली आहे. एका चाहत्यानं परेश रावल यांना प्रश्न केला होता की खरंच हेरा फेरीच्या तिसऱ्या भागात कार्तिक आर्यनची एन्ट्री होणार आहे? यावर परेश रावल यांनी उत्तर दिलं, होय, हे खरं आहे’.
कार्तिक आर्यन अक्षय कुमारला रिप्लेस करणार असल्याचं ऐकताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पहायला मिळतोय. अनेकांनी अक्षयशिवाय हा चित्रपट अपूर्ण असेल असं म्हटलंय. तर काहींनी म्हटलंय असं पृथ्वीवर ऑक्सीजन गरजेचा आहे तसा हेरा फेरीमध्ये अक्षय. ‘नो अक्षय, नो हेरा फेरी’ असं ट्विटरवर ट्रेंड होत असल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान, कार्तिकने नुकतंच भुल भुलैया 2 मध्ये अक्षयला रिप्लेस केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आता खरंच कार्तिक ‘हेरा फेरी 3’ दिसणार आहे का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या चित्रपचात फायनल कास्ट कोण असणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष आहे. कार्तिक आर्यन एकाच वेळी अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे. यामध्ये ‘सत्यप्रेम की कथा’, ‘आशिकी 3’, ‘प्यार का पंचनामा 3’, ‘शहजादे’, ‘हेरा फेरी 3’ यांचा समावेश आहे. साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांचा ‘कॅप्टन इंडिया’ चित्रपटही कार्तिक आर्यनकडे आहे. त्याचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे.