JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / हा घ्या पुरावा! चाहत्यांना रिप्लाय देण्याच्या बदल्यात कार्तिक आर्यन घेतो पैसे

हा घ्या पुरावा! चाहत्यांना रिप्लाय देण्याच्या बदल्यात कार्तिक आर्यन घेतो पैसे

सोशल मीडियावर कार्तिकचे खूप चाहते आहेत. पण चाहत्यांना रिप्लाय देण्यासाठी कार्तिक त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचं त्याच्याच एका पोस्टवरुन समोर आलं…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 मार्च : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांमध्ये गणला जात आहे. एकमागोमाग एक हिट सिनेमा दिल्यानंतर सध्या कार्तिककडे नव्या प्रोजेक्टची अक्षरशः रांग लागली आहे. ज्यामुळे तो सध्या खूप बीझी आहे. पण या व्यतिरिक्त कार्तिक त्याच्या चार्मिंग पर्सनॅलिटीमुळे सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतो. सोशल मीडियावर कार्तिकची तगडी फॅन फॉलोइंग आहे. पण आपल्या चाहत्यांना रिप्लाय देण्यासाठी कार्तिक आर्यन त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचं त्याच्याच एका सोशल मीडिया पोस्टवरुन समोर आलं आहे. ज्यामुळे त्यानं एका चाहतीला दिलेला रिप्लाय चर्चेचा कारण ठरला आहे. कार्तिक आर्यननं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला होता. ज्यावर त्याच्या चाहत्यांनी कमेंट करायला सुरुवात केली. या दरम्यान एका मुलीनं त्याच्या फोटोवर अशी कमेंट केली की तिच्या कमेंटवर कार्तिकनं तिला रिप्लाय सुद्धा दिला. पण त्याची हाच रिप्लाय आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलीनं कार्तिकच्या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, ‘भाई मी तुला एक लाख देईन, प्लिज या बहिणीला रिप्लाय दे’ तिच्या या कमेंटवर कार्तिकनं रिप्लाय दिला. त्यानं लिहिलं, ‘हा घे रिप्लाय, पण माझे पैसे कुठे आहेत.’ ब्रँडेड घड्याळांचे चाहते आहेत हे बॉलिवूडकर, या किंमतीत तुम्ही मुंबईत घ्याल घर

चाहतीच्या कमेंटवर केलेला हा कार्तिकचा हा रिप्लाय सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. लोक याच्यावर खूप कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलं, ‘कार्तिक आर्यनला पैसे पाठवले नाही का अजून?’ तर दुसऱ्या एकानं लिहिलं, ‘भाऊ म्हणून रिप्लाय मागितला तर तो कधीच देणार नाही.’ ‘वेबसीरिज गर्ल’ मिथिला पालकरच्या HOT बिकिनी लुकवर चाहते क्लिनबोल्ड! कार्तिकच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सध्या तो 2007मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या ‘भूल भुलैय्या’च्या सीक्वेलच्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कियारा अडवाणी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे धर्मा प्रॉडक्शनचा ‘दोस्ताना 2’ सुद्धा आहे. ज्यात तो जान्हवी कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ‘जब वी मेट’च्या सीनची कॉपी करताना झाला अपघात, श्वेता तिवारी जखमी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या