JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Kartik Aaryan: कार्तिक आर्यनला मुंबई पोलिसांचा दणका; सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या अभिनेत्याकडून नेमकं काय घडलं?

Kartik Aaryan: कार्तिक आर्यनला मुंबई पोलिसांचा दणका; सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या अभिनेत्याकडून नेमकं काय घडलं?

Kartik Aaryan Siddhivinayak Darshan: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ हा सिनेमा नुकतंच रिलीज झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जाहिरात

कार्तिक आर्यन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन चा ‘शेहजादा’ हा सिनेमा नुकतंच रिलीज झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्तिकच्या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशीच करत अपेक्षा वाढवल्या आहेत. दरम्यान अभिनेता आपल्या या नव्या सिनेमाच्या यशासाठी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचला होता. परंतु त्यावेळी अभिनेत्याकडून एक चूक घडली. ज्यामुळे त्याला मुंबई पोलिसांचा दणका बसला आहे. कार्तिक आर्यनने फारच कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. अभिनेत्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तरुणी तर तरुणी तरुण मुलंही कार्तिकवर फिदा आहेत. गेलं वर्ष कार्तिक आर्यनसाठी फारच खास ठरलं. कारण या काळात इंडस्ट्रीमधील मोठंमोठ्या कलाकारांचे चित्रपट दणकून आपटले. परंतु कार्तिकच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमत हिट सिनेमांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. आता कार्तिकसाठी 2023 वर्ष कसं असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (हे वाचा: Prabhas-Kriti Sanon: क्रिती सेनन-प्रभास खरंच रिलेशनशिपमध्ये? साखरपुड्याच्या वृत्तांवर अभिनेत्रीने अखेर सोडलं मौन ) कार्तिकच्या या नव्या वर्षाची सुरुवात तर चांगली झाली आहे. अभिनेत्याचा ‘शेहजादा’ चांगली कमाई करत आहे. नुकतंच कार्तिक आपल्या या चित्रपटाच्या यशासाठी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला होता. कार्तिक याठिकाणी पोहोचताच तिथे उपस्थित पापाराझींनी त्याला घेरलं. त्याचे मंदिराबाहेरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

संबंधित बातम्या

परंतु आता अभिनेत्याला मुंबई पोलिसांनी दणका दिल्याचं समोर आलं आहे. कार्तिक आर्यनने सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाताना, आपली आलिशान कार चुकीच्या ठिकाणी पार्क केली होती. त्यामुळे सर्वांना नियम समान या गोष्टीचं पालन करत मुंबई ट्राफिक पोलिसांनी अभिनेत्याकडून चालान वसूल केलं. दरम्यान मुंबई पोलिसांनीही आपल्या खास अंदाजात सोशल मीडियावर ट्विट करत अभिनेत्याला दंड का भरावा लागला याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबईच्या ट्राफिक पोलिसांनी कार्तिक आर्यनच्या एका डायलॉगची कॉपी करत ट्विटमध्ये लिहलंय, ‘प्रॉब्लेम? प्रॉब्लेम हा होता की, कार चुकीचा बाजूला पार्क करण्यात आली होती… शेहजादा ट्राफिक नियम मोडतो… ही चूक करु नका…’ असं म्हणत मुंबई पोलिसांनी सर्वांचं लक्ष केंद्रित केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या