मुंबई, 07 जानेवारी : अभिनेता सैफ अली खान (Saif ali khan) आणि अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena kapoor khan) हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चित सेलिब्रिटी कपलपैकी एक आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडींवर पॅपराजींची नजर असते. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. नुकताच सैफ आणि करीना यांचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात त्यांची सर्वात मोठी चूक केल्याचं दिसलं आहे (Saif ali khan Kareena kapoor khan trolled) . सैफ आणि करीना यांनी खुलेआम सर्वात मोठी चूक केली. नेटिझन्सनी ही चूक पकडली आणि दोघांनाही चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. करीना आणि सैफचा एका कारमध्ये बसलेले असल्याचा हा व्हिडीओ आहे. ज्यात सैफ गाडी चालवताना दिसतो आहे तर करीना त्याच्या शेजारी बसून फोनवर बोलते आहे. विरल भयानीने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आता हा व्हिडीओ पोस्ट होताच नेटिझन्सनी या कपलला टार्गेटच केलं. त्यांनी नेमकी अशी काय चूक केली आहे, हे तुम्हाला या व्हिडीओत दिसते आहे का पाहा. हे वाचा - बॉयफ्रेंड Ranbir Kapoor च्या या स्कील्सवर Alia Bhatt फिदा, पाहा Photos व्हिडीओ नीट पाहिला तर तुम्हाला दिसेल की सैफ आणि करीना दोघांच्या चेहऱ्यावर मास्क नाही आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारच्या फ्रंट सीटवर बसलेले असताना दोघांनीही सीट बेल्ट लावलेलं नाही आहे.
कदाचित घाईघाईत दोघंही या गोष्टी विसरले असतील पण नेटिझन्सनी मात्र त्यांना या चुकीला माफी दिलेली नाही. त्यांची सोशल मीडियावर चांगलीच शाळा घेतली आहे. “सेलिब्रिटींना सीट बेल्ट लावण्याची गरज नाही का?”, “यांनी काही वापरलं नाही तर चालेल पण आमच्यासाठी फाइन, व्वा रे दुनिया”, अशा कमेंट हा व्हिडीओ पाहिल्यानंतर येत आहेत. हे वाचा - बॉयफ्रेंड Ranbir Kapoor च्या या स्कील्सवर Alia Bhatt फिदा, पाहा Photos काही दिवसांपूर्वीच करीना कपूरलाही कोरोना झाला होता. डिसेंबरमध्ये तिला कोरोनाचं निदान झालं. काही दिवस ती आयसोलेट होती. आता ती कोरोनातून पूर्णपणे बरी झाली आहे. त्यानंतर तिने आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस पार्टीही केली होती.