JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Celebes Education:अभिनेता बनण्यापूर्वी 'या' क्षेत्रात सक्रिय होता करण कुंद्रा; एका मालिकेनं बदललं नशीब

Celebes Education:अभिनेता बनण्यापूर्वी 'या' क्षेत्रात सक्रिय होता करण कुंद्रा; एका मालिकेनं बदललं नशीब

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता करण कुंद्राला आज वेगळ्या ओळखीची गरज नाहीय. अनेक मालिकांमध्ये झळकलेला करण कुंद्रा ‘बिग बॉस 15’ मुळे सर्वाधिक चर्चेत आला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 सप्टेंबर-  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता करण कुंद्राला आज वेगळ्या ओळखीची गरज नाहीय. अनेक मालिकांमध्ये झळकलेला करण कुंद्रा ‘बिग बॉस 15’ मुळे सर्वाधिक चर्चेत आला होता. करण 2009 पासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. आपल्या लव्हलाईफमुळे सतत चर्चेत असणारा करण कुंद्रा मूळचा पंजाबचा आहे. करण कुंद्रा उच्चशिक्षित आहे. अभिनेता बनण्यापूर्वी करणने मोठी डिग्री घेतली आहे. करण अनेक वेबसिरीज, रिअॅलिटी शो आणि पंजाबी चित्रपटांमध्येही दिसला आहे हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु आज आपण अभिनेत्याच्या शैक्षणिक कारकिर्दीबाबत जाणून घेणार आहोत.

छोट्या पडद्यावरील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये आज करण कुंद्राचं नाव घेतलं जातं. करण कुंद्राचा जन्म 11 ऑक्टोबर 1984 रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला होता. त्याचे वडील एसपी कुंद्रा यांचा पंजाबमध्ये कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तर आई सुनीता कुंद्रा या एक गृहिणी आहेत. करणला तीन बहिणीही आहेत.अभिनेता आपल्या कुटुंबाच्या फारच जवळ आहे. तो सतत आपल्या आईसोबत दिसून येतो. अभिनेता करण कुंद्रा हा टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात शिक्षित अभिनेत्यांमध्येसुद्धा गणना जातो. करणने आपलं सुरुवातीचं शिक्षण राजस्थानच्या अजमेर येथील मेयो कॉलेजमधून घेतलं आहे. त्यानंतर अभिनेत्याने पंजाबमधील जालंधर येथील एपीजे कॉलेज ऑफ फाइन आर्ट्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.पंजाबमधून डिग्री घेतल्यानंतर करण कुंद्रा उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता. तेथे त्यानं फ्लोरिडा येथून एमबीए केलं आहे. भारतात आल्यानंतर अभिनेत्याने वडिलांच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायातसुद्धा मदत केली आहे. करणने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी जालंधरमध्ये आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू केलं होतं. त्यामुळे अभिनेता बनण्यापूर्वी करण एक यशस्वी व्यावसायिक होता. (हे वाचा: Celebes Education: श्रद्धा कपूरने विदेशातून घेतलंय उच्चशिक्षण; सिनेमाची ऑफर मिळताच बदलला करिअर प्लॅन **)** करण कुंद्राने जवळपास 2010 मध्ये ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेतून आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात केली होती. या पहिल्याच मालिकेने करणला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यानंतर करणने अनेक मालिका आणि रिऍलिटी शोमध्ये काम केलं आहे. नुकतंच तो ‘बिग बॉस 15’ मध्ये झळकला होता. या शोमध्ये त्याची आणि अभिनेत्री तेजस्वि प्रकाशसोबत जवळीकता निर्माण झाली होती. करण सध्या तेजस्वीला डेट करत आहे. हे दोघे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. यांच्या जोडीला मोठी पसंती मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या