JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / करण जोहरच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅनसमोर करोडोंचा बंगलादेखील फिका, पाहा VIDEO

करण जोहरच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅनसमोर करोडोंचा बंगलादेखील फिका, पाहा VIDEO

बॉलिवूडचा प्रसिद्ध फिल्ममेकर करण जोहर हा कायमच चर्चेचा विषय असतो. फंकी फॅशन आणि लग्झरीयस जीवनशैलीसाठी तो ओळखला जातो.

जाहिरात

करण जोहर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 नोव्हेंबर : बॉलिवूडचा प्रसिद्ध फिल्ममेकर  करण जोहर  हा कायमच चर्चेचा विषय असतो. फंकी फॅशन आणि लग्झरीयस जीवनशैलीसाठी तो ओळखला जातो. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी तो चर्चेत असतो. अशातच करण जोहर पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळेस तो त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमुळे चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅनची टूर करुन दिली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याच्या महागड्या आणि आलिशान व्हॅनिटी व्हॅनची एकच चर्चा रंगली आहे. करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम व्हॅनिटी व्हॅनची टूर दाखवली आहे. करणची ही व्हॅनिटी एखाद्या आलिशान बंगल्यापेक्षा कमी नाही. करणच्या व्हॅनिटीमध्ये त्याच्या जॅकेट, शूट आणि अॅक्सेसरीजसाठी खास वॉर्डरोब आहे. सोबतच पाहुण्यांसाठी कॉफी मशीन आणि सोफादेखील आहे. लंच आणि डिनरसाठी मायक्रोव्हेव्हदेखील आहे. त्याने शेअर केलेला हा व्हॅनिटी टूर व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आहे. व्हिडीओवर नेटकरी भरभरुन कमेंट करत त्याच्या व्हॅनविषयी बोलत आहेत.

संबंधित बातम्या

व्हिडीओमध्ये करण म्हणतोय, चष्मा ठेवण्यासाठी मला खूप जागा हवी आहे. मला माझ्या अंगठ्या आणि अॅक्सेसरीजसाठीही जागा हवी आहे. मला व्हॅनिटीमध्ये आरामदायी कुशनही हवे आहेत, जे प्रोडक्शन डिझायनर अमृताने माझ्या स्वेटशर्टमधून डिझाइन केले आहेत. तिने माझे बरेच स्वेटशर्ट फाडले आहेत आणि त्यातून हे छान उशी बनवल्या आहेत. याशिवाय मला माझ्या जॅकेटसाठीही जागा हवी आहे. तसेच एक कॉफी मशीन, कारण काही पाहुणे येतात आणि त्यांना कॉफी आवडते.

दरम्यान, कामाबद्दल बोलायचे झाले तर, करण जोहर त्याच्या पुढील चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ वर काम करत आहे, जो पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटासाठी आलिया आणि रणवीरचे चाहते खूप उत्सुक आहेत. गल्ली बॉयनंतर दोघेही पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या