कपिल शर्मा
मुंबई, 13 एप्रिल : टीव्हीवर आपला ठसा उमटवल्यानंतर कपिल शर्माने 2015 मध्ये ‘किस किस को प्यार करूं’ या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तो तीन अभिनेत्रींसोबत फ्लर्ट करताना दिसला होता. या कॉमेडी-ड्रामाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली. तसंच तो नुकताच झ्विगाटो मध्ये अतिशय सिरीयस भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने अनेक पुरस्कारांची कमाई केली असली तरी मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नव्हता. आता यानंतर कपिल शर्मा लवकरच एका मोठ्या सिनेमात झळकणार आहे. अशी बातमी आहे की तो लवकरच करीना कपूरसोबत एका चित्रपटात दिसणार आहे.
प्रेक्षकांना खळखळून हसवणारे कॉमेडियन कपिल शर्माचे तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकले नाहीत. मात्र, त्याने आपल्या अभिनयाने लोकांची मने नक्कीच जिंकली. आता त्याला अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स मिळू लागल्याची बातमी आहे. लवकरच कॉमेडियन कपिल शर्मा एका बिग बॅनर चित्रपटात दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर कपिल शर्माला एकता कपूरचा चित्रपट मिळाला आहे. चित्रपटाचे नाव ‘द क्रू’ असे सांगितले जात आहे. या चित्रपटात कपिल शर्मा व्यतिरिक्त करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनॉन देखील दिसणार आहेत. Samantha Ruth Prabhu: ऐन आनंदाच्या क्षणी बिघडली समंथाची तब्येत; अभिनेत्रीचा आवाजही गेला पिंकविलाला याबद्दल माहिती देताना, चित्रपटातील एका सूत्राने सांगितले की, ‘कपिल ‘द क्रू’ या चित्रपटात एक उत्तम भूमिका साकारण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या चित्रपटाचा भाग होण्यासाठी संपूर्ण टीम खूप उत्सुक आहे. तो लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात करू शकतो. आता मिळालेल्या माहितीनुसार, क्रिती सेननने गेल्या महिन्यात चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, तर करीना कपूर खान काही दिवसांपूर्वी टीमचा भाग बनली आहे. रिपोर्ट्सनुसार, या आठवड्यापासून तब्बूही चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ‘द क्रू’ असे या चित्रपटाचे नाव असून, एकता कपूर आणि रिया कपूर मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश कृष्णा सांभाळत आहेत. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर कपिल शर्मा व्यतिरिक्त करीना देखील या चित्रपटात दिसणार आहे. करिना शेवटची ‘लाल सिंह चढ्ढा’मध्ये दिसली होती. ‘द क्रू’ हे या चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील विविध भागात होणार आहे. बहुतांश शूटिंग मुंबईत होणार आहे. या चित्रपटाबाबत कपिल शर्माने आधीच संकेत देत होते. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘दृश्यम 2’ चे कलाकार आले तेव्हा कपिलने वारंवार सांगितले होते की, त्याला तब्बूसोबत काम करायचे आहे आणि ही त्याची लहानपणापासूनची इच्छा होती. आता या सगळ्या कलाकरांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.