मुंबई, 24 नोव्हेंबर : कंगना रणौतचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘थलायवी’चा या पहिलं पोस्टर रिलीज झालं आणि यासोबतच या सिनेमात ‘अम्मां’ची भूमिका साकरणाऱ्या कंगना रणौतचा फर्स्ट लुक सुद्धा समोर आला. जयललिता यांच्या या बायोपिकमध्ये कंगना खूपच वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. पण कंगनाचा हा लुक प्रेक्षकांना मात्र अजिबात आवडलेला नाही. यामुळे फर्स्ट लुक समोर आल्यानंतर कंगना रणौतला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागत आहे. ‘थलायवी’च्या पहिल्या पोस्टरवर कंगना रणौत जयललितांसारख्याच ग्रीन केपमध्ये दिसत आहेत. तसेच या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये कंगना विक्ट्री साइन देताना दिसत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. हा सिनेमा 26 जून 2020 ला रिलीज होणार आहे. जेव्हा या सिनेमाची घोषणा झाली आहे. तेव्हा पासून या सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. पण पहिलं पोस्टर रिलीज झाल्यावर मात्र सर्वांचीच निराशा झालेली दिसली. ‘हे’ आहेत सलमान खानचे बॉलिवूडमधील सर्वात कट्टर वैरी!
जयललितांच्या बायोपिकचा फर्स्ट लुक पाहिल्यानंतर एका युजरनं लिहिलं, या पोस्टमध्ये ना ती कंगनासारखी दिसत आहे आणि नाही ती जयललिता सारखी दिसतेय. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, असं वाटतंय की कंगना रणौतला 3 दिवस कोणातरी पाण्यात भिजवून ठेवलं होतं. तर काही युजर्सनी कंगनाचा हा लुक म्हणजे जयललितांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. पण काही लोकांनी मात्र कंगनाचा लुक आणि तिच्या मेहनतीचं कौतुक केलं आहे.
कोणीतरी आवरा हिला! सारा अली खानचे काळ्या-निळ्या लिपस्टिकमधील PHOTO VIRAL
 जयललितांच्या या बायोपिकसाठी कंगना रणौतनं प्रोस्थेटिक मेकअपची मदत घेतली आहे. हा मेकअप खूप जड असतो. तसेच हा मेकअप सांभाळणं कलाकरांसाठी एक टास्क असतो. या सिनेमात जयललितांची भूमिका साकरण्यासाठी कंगनानं खूप मेहनत घेतली आहे. यासिनेमासाठी ती भरतनाट्यम आणि तमिळ भाषा सुद्धा शिकली. जयललिता यांचा बायोपिक ‘थलायवी’ तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी कंगनानं 20 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं बोललं जात आहे.
‘या’ साेप्या प्रश्नावर स्पर्धक KBC 11 मधून बाहेर, तुम्हाला माहित आहे का उत्तर?
==========================================================================