JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नाआधीच प्रेग्नन्ट आहे कल्कि कोचलिन, अभिनेत्रीनं सांगितलं काय होती आईची प्रतिक्रिया

लग्नाआधीच प्रेग्नन्ट आहे कल्कि कोचलिन, अभिनेत्रीनं सांगितलं काय होती आईची प्रतिक्रिया

कल्कि लग्नाच्या आधीच प्रेग्नंट असल्यानं तिला बऱ्याच टिकेचा सामना करावा लागला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जानेवारी : बॉलिवूडमध्ये दमदार अभिनय आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कल्कि कोचलिन सध्या तिच्या पर्सनल लाइफमुळे खूप चर्चेत आहे. 2018च्या सरते शेवटी तिनं प्रेग्नन्सीची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण कल्कि लग्नाच्या आधीच प्रेग्नंट असल्यानं तिला बऱ्याच टिकेचा सामना करावा लागला. मात्र त्यावर कल्किनं कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता कल्किनं यावर मौन सोडलं असून आपल्या प्रेग्नन्सीबद्दल समजल्यावर आईची प्रतिक्रिया काय होती याचाही खुलासा तिनं केला आहे. कल्किनं नुकतीच करिनाकपूरच्या इश्क एफएम या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिनं तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले. यावेळी बोलताना कल्कि म्हणाली, मी जेव्हा माझ्या प्रेग्नन्सीविषयी माझ्या कुटुंबीयांना सांगितलं तेव्हा माझ्या आईनं माझ्या निर्णयाचं स्वागत केलं. तिनं सांगितल की लग्नाआधी आई होणं चुकीचं नाही पण जेव्हा पुढच्या वेळी तू लग्नाचा विचार करशील तेव्हा विचारपूर्वक निर्णय घे. तुला ज्याच्यासोबत सुरक्षित वाटेल त्या व्यक्तीशी तू लग्न करावं असं मला वाटतं. निक जोनसचा ‘तो’ HOT व्हिडीओ पाहून प्रियांकानं घेतला होता लग्नाचा निर्णय!

कल्कि पुढे म्हणाली माझ्या आईनं मला असा सल्ला यासाठी दिला कारण माझा याधीही घटस्फोट झाला आहे. त्यामुळे आईला माझी काळजी वाटते. मला सुद्धा लग्नाची घाई नाही. त्यामुळे मी लग्नाआधी आई होण्याचा निर्णय घेतला. माजी मिस इंडिया वर्ल्डला अश्लील फोटोंवर टॅग करत होता भामटा, FIR दाखल करिना कपूरनं जेव्हा कल्किला विचारलं की जेव्हा तुझ्या या निर्णयावर सर्वांनी टीका केली तेव्हा तू याचा सामना कसा केलास. कल्कि म्हणाली, माझ्याकडे एक सुपर पॉवर आहे. मी माझा फोन स्विच ऑफ करते आणि सोशल मीडियापासून दूर राहते. जेव्हा मला मोटिव्हेशनची गरज असते. तेव्हा मी माझ्या कुटुंबीयांशी बोलते. त्यांचा सल्ला घेते.

माझ्या कुटुंबीयांनी मला माझ्या बाळाच्या उज्वल भविष्यासाठी लग्न करण्याचा सल्ला दिला त्यामुळे मी आणि माझा पार्टनर सध्या याविषयीचा विचार करत आहोत. मी प्रेग्नन्ट असल्याचं समजल्यावर सर्वात जास्त तो खूश होता. मला हे स्वीकारायला 1-2 दिवस लागले पण मी जेव्हा त्याला प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं तेव्हा तो लगेच बाळासाठी तयार झाला. मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर 4 दिवस उपाशी होते जावेद अख्तर, पत्नीचा खुलासा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या