काजोल
मुंबई, 10 फेब्रुवारी- बॉलिवूडची सुंदर, गुणी अभिनेत्री
काजोल
वयाची पन्नाशी गाठायला आलेली असली तरी तिचं सौंदर्य कमी होण्याऐवजी वाढतच आहे. न्यासाची आई काजोल दिवसेंदिवस फारच सुंदर दिसत आहे. काजोलच्या सावळ्या रंगाबद्दल तिला अनेकदा प्रश्न विचारले जातात. काजोलला रोखठोक उत्तर देण्यासाठी ओळखलं जातं. अभिनेत्री आपला प्रत्येक मुद्दा स्पष्टपणे सर्वांसमोर मांडत असते. तिचा हा स्वभाव अनेकांना आवडतो. तर काहींना खटकतो. दरम्यान सोशल मीडियावर आपला एक मजेदार फोटो शेअर करत काजोलने गोरी त्वचेबाबत प्रश्न विचारणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे. काजोल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.अशातच काजोलने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये काजोल काळ्या रंगाचा मास्क घातलेल्या मास्क मॅनसारखी दिसत आहे. अभिनेत्रीने सनग्लासेससुद्धा घातलेले दिसत आहेत. या फोटोमध्ये काजोलचा चेहरा पूर्णपणे झाकलेला आहे. हा फोटो क्लिक करताना काजोलला वाटले की, गोऱ्या रंगाबद्दल प्रश्न विचारणाऱ्यांना यापेक्षा चांगले उत्तर देता येणार नाही.त्यामुळे अभिनेत्रीने चक्क हा फोटो पोस्ट केला आहे. (हे वाचा:
Samantha Prabhu: समंथा प्रभूने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर; नव्या प्रॉपर्टीची किंमत थक्क करणारी
) काजोलने शेअर केलेला हा फोटो पाहून असे वाटते की, हा फोटो एखाद्या दुकानातून खरेदी केल्यानंतर क्लिक केला आहे. कारण अभिनेत्रीच्या मागे कपडे दिसून येत आहेत तसेच त्या मास्कवर किंमतीचा टॅगही दिसत आहे. आपला फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलय, ‘जे मला विचारत राहतात की मी इतकी गोरी कशी झाले त्यांच्यासाठी हे…यासोबत अभिनेत्रीने हॅशटॅग सन ब्लॉक आणि हसणाऱ्या इमोजीसह एसपीएफअनबिटेबल असं लिहिलं आहे. काजोलने हे मजेशीरपणे लिहिले असले तरी ट्रोल करणाऱ्यांना यातून चोख उत्तरही दिले आहे. काजोलला अनेकवेळा तिच्या सावळ्या रंगांवरून हिणवण्यात आलं आहे. अनेकवेळा तिला विचारण्यात आलं आहे की, ती पूर्वी सावळी दिसायची मग आता गोरी कशी झाली? बर्याच वेळा त्वचेची शस्त्रक्रिया किंवा त्वचा लाइटनिंग करून घ्या, असा सल्ला तिला देण्यात आला आहे.
‘पिंकविला’ला दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने म्हटलं होतं की, ‘मी स्किन व्हाइटिंग किंवा यासंबंधित कोणतीही सर्जरी केलेली नाही. मी स्वतःचा सूर्यापासून बचाव केला, मी माझ्या आयुष्यातील 10 वर्षे उन्हात काम केलं होतं. त्यामुळे माझी त्वचा टॅन झालेली. आता मी प्रखर सूर्यप्रकाशात काम करत नाही मी घरी असते त्यामुळे मी ठीक आहे. ही त्वचा गोरी करण्याची शस्त्रक्रिया नसून घरी राहण्याची शस्त्रक्रिया आहे’. असं म्हणत काजोलने नेटकऱ्यांना स्पष्ट उत्तर दिलं होतं.