JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'कहो ना प्यार है' या शीर्षक गीतचे गीतकार अब्राहम अश्क काळाच्या पडद्याआड

'कहो ना प्यार है' या शीर्षक गीतचे गीतकार अब्राहम अश्क काळाच्या पडद्याआड

अभिनेता ऋतिक रोशनचा (Hrithik Roshan) गाजलेल्या ‘कहो ना प्यार है’ (Kaho Na Pyaar Hai) या चित्रपटाच्या शीर्षक गीतचे गीतकार अब्राहम अश्क (Ibrahim Ashq) यांचे रविवारी कोरोनामुळे (Corona Viras) मुंबईत निधन झाले.

जाहिरात

Ibrahim Ashq

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जानेवारी: अभिनेता ऋतिक रोशनचा (Hrithik Roshan)  गाजलेल्या ‘कहो ना प्यार है’  (Kaho Na Pyaar Hai) या चित्रपटाच्या शीर्षक गीतचे गीतकार अब्राहम अश्क (Ibrahim Ashq) यांचे रविवारी कोरोनामुळे (Corona Viras) मुंबईत निधन झाले.  अब्राहम अश्क यांची धाकटी मुलगी मुसफा खान हिने अब्राहम अश्क यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. रविवारी सायंकाळी 4.00 वाजता मीरा रोड येथील मेडीटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अब्राहम अश्क यांचे निधन झाले आहे. मुलगी मुसफा हिने अधिक माहिती देताना सांगितले की, शनिवारी सकाळी बाबांना खूप खोकला होता. तसेच रक्ताच्या उलट्या होत होत्या. त्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली. त्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास होता. त्यांची प्रकृती ढासळू लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर आज रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी 9 वाजता मीरा रोड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांच्या मुलीने दिली. राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेला कहो ना प्यार है या चित्रपतील सर्व गाणी हिट ठरली. यासोबतच त्यांनी, ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’, ‘वेलकम’ ‘ऐतबार’, ‘जानशीन’, ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ ‘बॉम्बे टू बैंकॉक’ अशा अनेक सिनेमांची गाणी लिहिली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या