JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / पठाण नंतर पुन्हा एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन अब्राहम? 'या' चित्रपटात करणार दमदार ऍक्शन

पठाण नंतर पुन्हा एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन अब्राहम? 'या' चित्रपटात करणार दमदार ऍक्शन

पठाण नंतर जॉन आणि शाहरुख खान एका बिग बजेट चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. कोणता आहे हा सिनेमा जाणून घ्या सविस्तर.

जाहिरात

शाहरुख खान आणि जॉन अब्राहम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 एप्रिल: अभिनेता शाहरुख खानने पठाण या सिनेमातुन तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. शाहरुख खान सोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. गेल्या  25 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक झालं. पण शाहरुख आणि जॉन अब्राहमची हिरो आणि व्हिलनची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली. या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री या सिनेमात पाहायला मिळाली. आता पठाण नंतर जॉन आणि शाहरुख खान एका बिग बजेट चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. कोणता आहे हा सिनेमा जाणून घ्या सविस्तर. बॉलिवूडच्या प्रसिद्ध फ्रँचायझी ‘धूम’शी अनेक बड्या कलाकारांची नावे जोडली गेली आहेत. ‘धूम’च्या पहिल्या भागात जॉन अब्राहम आणि त्याची बाईक सर्वांनाच वेड लावणारी ठरली. दुस-या भागात हृतिक रोशन आणि त्याच्या नवीन अवताराने मन जिंकून घेतले, तर तिसर्‍या भागात आमिर खान याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसला. आता या  फ्रँचायझीच्या चौथ्या भागासाठी अनेक जणांची नावे समोर येत आहेत. पण या यादीत जॉन अब्राहम आणि शाहरुख खान यांच्या नावांची सगळ्यात जास्त चर्चा आहे.

काही रिपोर्टनुसार धूम ४ मध्ये मुख्य भूमिकेसाठी शाहरुख खानला कास्ट केले जाईल. याबाबत नेमकी माहिती नसली तरी जॉन अब्राहमही यात असणार असल्याचे बोलले जात आहे. Krushna Abhishek: द कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडसाठी कृष्णा अभिषेक घेतोय दणकून मानधन; वाचून व्हाल थक्क या वर्षाच्या सुरुवातीला जॉन अब्राहमने शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात जबरदस्त काम केले होते. खलनायकाच्या भूमिकेत त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. जॉनची ही शैली लोकांना खूप आवडली. ‘बॉलिवूड हंगामा’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता यशराज फिल्म्सला त्याला पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत घ्यायचे आहे, तर त्यात गैर काहीच नाही. यात कोणत्याही अफवेपेक्षा जास्त सत्य असू शकते. खरं तर, गेल्या काही दिवसांपासून वायआरएफच्या रोजच्या बैठका होत आहेत आणि जॉन अनेक प्रसंगी या मीटिंगमध्ये दिसला आहे. विशेष म्हणजे, जॉन अब्राहमने ‘धूम’ फ्रँचायझीमध्ये परतण्याचे कारण म्हणजे, तुम्हाला आठवत असेल तर, ‘धूम’चा पहिला भाग खूपच मनोरंजक होता. चित्रपटात जॉनचे पात्र मेले होते की तो पळून गेला होता हे कळू शकले नाही. या गोष्टीकडे पाहता तो धूम फ्रँचायझीमध्ये पुनरागमन करताना दिसतो. जॉन अब्राहम ‘धूम 4’ सोबत ‘धूम’ फ्रँचायझीमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगत असली तरी अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण प्रेक्षक या दोघांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रचंड  आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या