JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : जिया खाननं 7 वर्षांपूर्वी केली आत्महत्या, आईनं सलमानवर लावले गंभीर आरोप

VIDEO : जिया खाननं 7 वर्षांपूर्वी केली आत्महत्या, आईनं सलमानवर लावले गंभीर आरोप

अभिनेत्री जिया खानची आई राबिया खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्यांनी जियाच्या आत्महत्येप्रकरणी सलमान खानवर गंभीर आरोप लावले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरलं आहे. सुशांतनं 14 जून रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडमधला घराणेशाहीच्या वाद पुन्हा वर आला. मागच्या 6 महिन्यात सुशांतकडून 7 सिनेमे काढून घेतल्याचं बोललं जात आहे. याशिवाय सलमान खान, करण जोहर सारख्या प्रसिद्ध सेलिब्रेटींच्या विरोधात सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या सर्वात आता दिवंगत अभिनेत्री जिया खानची आई राबिया खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्यांनी जियाच्या आत्महत्येप्रकरणी सलमान खानवर गंभीर आरोप लावले आहेत. अभिनेत्री जिया खाननं 2013 मध्ये डिप्रेशनमुळे आत्महत्या केली होती. ज्यानंतर तिच्या सुसाइड नोटमुळे तिचा बॉयफ्रेंड सूरज पंचोलीची बरीच चौकशी झाली होती आणि त्याला अटकही झाली होती. अशात आता टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं वृत्त ऐकल्यानंतर जियाची आई राबिया खान यांनी एक व्हिडीओ द्वारे बॉलिवूडच्या काम करण्याच्या पद्धतीवर टीका करत जिया खान केसची आठवण करून दिली. यादरम्यान त्यांनी अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.

राबिया खान यांनी म्हटलं, ‘या दुःखाच्या प्रसंगात मी सुशांतच्या कुटुंबीयांसोबत आहे. ही कोणत्याही प्रकारची मस्करी नाही. हा खूपच गंभीर प्रकार आहे. आता बॉलिवूडनं बदलणं गरजेचं आहे. अशाप्रकारचं वागणं आता बॉलिवूडनं पूर्णपणे थांबवायला हवं. एखाद्याला अशाप्रकारे त्रास देणं म्हणजे त्या व्यक्तीची हत्या केल्यासमान आहे.’ व्हिडीओमध्ये राबिया खान पुढे सांगतात, आज जे सुशांतसोबत झालं त्यानं 2015 मध्ये माझ्यासोबत घडलेल्या गोष्टींची मला आठवण करून दिली. जेव्हा मी माझ्या मुलीच्या केससाठी एका सीबीआय ऑफिसरला भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, मॅडम मला सलमान खानचा कॉल आला होता. तो रोज फोन करतो आणि सांगतो की या मुलावर आम्ही खूप पैसे गुंतवले आहेत. त्याची चौकशी करू नका, त्याला हातही लावायचा नाही. अशा आता आम्ही काय करावं मॅडम. राबिया यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. तसेच सलमानवर त्यांनी केलेल हे आरोप अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध सेलिब्रेटींविरोधात तक्रार, एकता कपूर भडकली ‘सिनेमात काम मिळालं नाही तर मी…’ सुशांतचा थ्रोबॅक व्हिडीओ होतोय व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या