करणसोबत घटस्फोटावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलली जेनिफर विंगेट
मुंबई, 31 मे- करण सिंग ग्रोव्हर हा छोट्या पडद्यावरील अतिशय गाजलेला अभिनेता आहे. करण ‘दिल मिल गये’, ‘कुबुल है’ यांसारख्या मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचला होता. प्रामुख्याने त्यांने तरुणाईला भुरळ पाडली होती. 2014 पर्यंत करण सिंग ग्रोव्हरने टीव्हीच्या दुनियेत 14 वर्षांचा प्रवास पूर्ण केला होता. करणने 14 वर्षात टीव्ही जगतात खास स्टारडम मिळवलं होतं. करणने त्याच्या हँडसम लूक, पिळदार शरीर आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तरुणांना वेड लावलं होतं. 2015 मध्ये करणने ‘अलोन’ चित्रपटाद्वारे बिपाशा बसूसोबत चित्रपटांमध्ये पदार्पण केलं होतं. हा एक हॉरर-रोमँटिक जॉनरचा चित्रपट होता. विशेष बाब म्हणजे हा चित्रपट मिळण्यापूर्वी 2012 मध्ये करणने प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट सोबत लग्न केलं होतं. अलोन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करणचं लग्न झालेलं होतं. जेनिफरसोबत तो सुखाने संसार करत होता. त्यांना छोट्या पडद्यावरील पॉवर कपलदेखील म्हटलं जायचं. दरम्यान, चित्रपटाच्या सेटवरुन करणच्या बिपाशासोबतच्या नात्याच्या अफवा उडू लागल्या होत्या. अशातच जेनिफर विंगेटने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर करण सिंग ग्रोव्हरचं बिपाशासोबतचं अफेअर हे त्यांच्या घटस्फोटाचं कारण असल्याचीही बातमी समोर आली होती. (हे वाचा: 3 वेळा मोडलं लग्न,दोनदा सोसल्या कॅन्सरच्या यातना; सुंदर अभिनेत्रीचा भयानक शेवट ) अलोन चित्रपटानंतर बिपाशा बसूने 2016 मध्ये करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केलं होतं. जेनिफर विंगेटनेही आता आपल्या घटस्फोटाबाबत साधला आहे. जेनिफर विंगेटने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘लग्नाला अपयशाचं नाव देणं माझ्यासाठी अन्यायकारक ठरेल. आपण ज्यासाठी खूप प्रयत्न करतो ते टिकवायचं असेल तर अयशस्वी हा शब्द वापरणं योग्य नाही. आमच्या लग्नात घडलेल्या कोणत्याही गोष्टीचा मला पश्चाताप होत नाही. तसेच मला माझ्या आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप होत नाही. मी माझ्या लग्नाला चूक म्हणू इच्छित नाही. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात पुढे गेलो आहोत आणि मला कोणत्याही कटू आठवणी नको आहेत. लग्न होणं माझ्यासाठी भावनांनी भरलेलं आहे. हा सगळा अनुभव खूपच अनोखा होता. अनेकवेळा मी माझ्या भावनांसमोर गुडघे टेकताना दिसले.पण माझे कुटुंब आणि माझे मित्र नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले.
करण सिंग ग्रोव्हर आणि जेनिफर विंगेट हे छोट्या पडद्यावरील सुपरस्टार आहेत. दोघांच्या जोडीवर चाहत्यांनीही भरभरून प्रेमाचा वर्षाव केला होता. पण करण सिंग ग्रोव्हरने जेनिफरसोबतच्या लग्नाला आपली चूक म्हटलं होतं. करण सिंग ग्रोव्हर आणि जेनिफर यांची भेट ‘दिल मिल गये’ या टीव्ही मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेत दोघांनी खूप रोमान्स केला होता. या मालिकेदरम्यान करण सिंग ग्रोवरने श्रद्धा निगमसोबत लग्न केलं होतं. दरम्यान, करण आणि जेनिफरच्या नात्याला सुरुवात झाली. लग्नाच्या 8 महिन्यांनंतरच करणने श्रद्धाला घटस्फोट दिला. जेनिफर आणि करणने 2012 मध्ये लग्न केलं होतं.