मुंबई, 11 सप्टेंबर : सोनी टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपतीचा सध्या 11 वा सीझन सुरु आहे. आतापर्यंत अनेक स्पर्धकांनी या शोमध्ये हजेरी लावली. मात्र अद्याप या शोला त्यांच्या या सीझनचा पहिला करोपती मिळाला नव्हता. मात्र त्याची प्रतिक्षा आता संपली आहे. KBC-11 ला त्यांचा पहिला-वहिला करोडपती मिळाला आहे. बिहारमधील ढोंगरा या छोट्याशा गावातून आलेल्या सनोज राजनं एक कोटीची रक्कम जिंकत नवा इतिहास रचला आहे. सोनी टीव्हीनं मंगळवारी (10 सप्टेंबर) त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरुन आगामी एपिसोडचा एक प्रोमो पोस्ट केला. ज्यात सनोज राज 15 व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देत एक कोटी रुपये जिंकल्याचं दिसत आहे. सोनी चॅनलनं पोस्ट केलेल्या या प्रोमोनुसार सिनोद आता 7 कोटींच्या प्रश्नासाठी हॉट सीटवर बसलेलला पाहायला मिळत आहे. येत्या गुरुवार आणि शुक्रवारी सोनी टीव्हीवर सनोजचा हा एपिसोड प्रसारित होणार आहे. कॉलेजमध्ये ड्रग्ज देऊन केलं माझं लैंगिक शोषण, अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ
मुळचा बिहारचा असलेल्या सनोज राजनं याआधी कधीच शहर पाहिलं नव्हतं. त्याचे वडील रामजनम शर्मा एक सर्वसाधारण शेतकरी आहे. सिनोजनं जहानाबादमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानं वर्धमान कॉलेजमधून बीटेकची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यानं सहाय्यक कमांडेंट पदावर मागच्या दोन वर्षांपासून नोकरी करत आहे. मात्र त्याला शासकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. तो आयएएस होऊ इच्छितो. ऐश्वर्या रायच्या डोहाळे जेवणाचे फोटो झाले VIRAL, 8 वर्षांपूर्वी असं दिसायचं कपल या शोमध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी बिहारचा रंजित कुमार 25 लाख रुपये जिंकला आहे. मुघलकाळातील निगडीत एका प्रश्नाचं उत्तर देऊ न शकल्यानं तो फक्त 25 लाखांपर्यंत मजल मारु शकला. रंजित कुमार गुड़गांवमध्ये नोकरी करतो आणि तो इलेक्ट्रिशियन आहे. याशिवाय KBC मध्ये पूर्वी चंपारण जिल्ह्यातील सुशिल कुमारनं पाच कोटीची रक्कम जिंकली होती. संजय दत्त आता या मुलीच्या प्रेमात, I Love You म्हणतानाचा व्हिडीओ आला समोर =========================================================== VIDEO : ‘राणादा’च्या घरचा गणपती, केलं ईको फ्रेंडली गणेशोत्सवाचं आवाहन