JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / जया बच्चन सर्वांसमोर करिश्माला म्हणाल्या होत्या 'सूनबाई', 20 वर्षांनी पुन्हा व्हायरल होतोय 'तो' VIDEO

जया बच्चन सर्वांसमोर करिश्माला म्हणाल्या होत्या 'सूनबाई', 20 वर्षांनी पुन्हा व्हायरल होतोय 'तो' VIDEO

सोशल मीडियावर सेलेब्सचे अनेक जुने-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर जया बच्चन आणि करिश्मा कपूरचा एक जूना व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

जाहिरात

जया बच्चन सर्वांसमोर करिश्माला म्हणाल्या होत्या 'सूनबाई..

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जून- सोशल मीडियावर सेलेब्सचे अनेक जुने-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर जया बच्चन आणि करिश्मा कपूरचा एक जूना व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओत जय बच्चन यांनी करिश्माला ही आमची सूनबाई..असं म्हटलं आहे..यावर करिश्माची प्रतिक्रिया पाहण्यालायक अशी होती. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चनचं बॉलिवूडमधील आदर्श कपल आहे, या दोघांना एक मुलगी आहे. दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे. तर करिश्मा कपूरने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केलं होतं. तिला दोन मुलंही आहेत आणि घटस्फोट झाला आहे. अशातच सध्या जया बच्चन यांचा एक जूना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण एक काळ असा होता की,अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरची लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत आली होती. दोघांनी साखरपुडा केल्याची माहिती समोर आली होती. पण नंतर काही कारणांनी हे नातं तुटलं. मात्र, एका इव्हेंटमध्ये जया बच्चन यांनी भर मीडियासमोर याची घोषणा केली होती आणि करिश्मा आपली भावी सूनबाई आहे..असं म्हटलं होतं. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या इव्हेंटमध्ये अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चन आणि तिचे सासरचे लोकही उपस्थित होते. श्वेताचं लग्न करिश्माची आत्याच्या मुलगा निखिल नंदासोबत झालं आहे. या इव्हेंटमध्ये जया बच्चन म्हणताना दिसत आहे की, आता कपूर खानदानासोबतही त्यांचं नातं जुळलं जाणार आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये जया बच्चन करिश्माला त्यांची सूनबाई म्हणून लोकांना ओळख करून देताना दिसत आहे. आणि सांगतात की, अभिषेकने आपल्या वडिलांना 60 व्या वाढदिवसाला हे गिफ्ट दिलं आहे.

Jaya bachchan announced Karishma Kapoor as their DIL…. or fir mohalle mein Aishwarya aai by u/nasheeladhokla in BollyBlindsNGossip

पाच वर्षे होतं करिश्मा आणि अभिषेत यांचे अफेअर मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचं साधारण पाच वर्षे अफेअर सुरू होतं. त्यांच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. पण जया बच्चन यांनी केलेल्या या घोषणेच्या एका वर्षांनंतर म्हणजे 2003 मध्ये करिश्माचं लग्न संजय कपूरसोबत झालं होतं. करिश्मा आणि अभिषेकचं लग्न तुटल्यावर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झाली होती. काही रिपोर्ट्सनुसार, बबिता या नात्याने खूश नव्हती. कारण त्यावेळी अभिषेकचे सिनेमे चालत नव्हते. तेच काही बातम्यांनुसार, जया बच्चन यांना मान्य नव्हतं की, करिश्माने लग्नानंतरही काम सुरू ठेवावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या