JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Jawan च्या एका गाण्यासाठी किंग खानने खर्च केला पाण्यासारखा पैसा; एका फिल्मएवढं आहे बजेट

Jawan च्या एका गाण्यासाठी किंग खानने खर्च केला पाण्यासारखा पैसा; एका फिल्मएवढं आहे बजेट

‘जवान’चं एक गाणं बनवण्यासाठी करोडो रूपयांचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर या गाण्याच्या अक्खा बजेटमध्ये एक चित्रपट बनवून होईल इतकं तगडं या गाण्याचं बजेट आहे.

जाहिरात

जवान

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जुलै : सुपरस्टार शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. किंग खानच्या या सिनेमाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख खानचा ‘जवान’ बॉक्स ऑफिसवरील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स तोडेल असा दावा सगळेच करत आहेत. काही दिवसांपूर्वी शाहरुखने ‘जवान’च्या प्रिव्ह्यूने खळबळ उडवून दिली होती. चित्रपटाबद्दल येणारी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता या चित्रपटाबाबत ताजी अपडेट समोर आली आहे. ‘जवान’चं एक गाणं बनवण्यासाठी करोडो रूपयांचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर या गाण्याच्या अक्खा बजेटमध्ये एक चित्रपट बनवून होईल इतकं तगडं या गाण्याचं बजेट आहे. झूम टीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, साऊथचा प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदरने ‘जवान’मधील ‘जिंदा बंदा’ हे गाणे संगीतबद्ध केले असून त्याला आवाजही दिला आहे. चेन्नईमध्ये या गाण्याचं शूटिंग झालं आहे. एका गाण्यासाठी चित्रपटाची टीम तब्बल पाच दिवस शूटिंग करत होती. या एका गाण्यासाठी हैदराबाद, बेंगळुरू, मदुराई आणि मुंबई सारख्या शहरांमधून 1000 महिला डान्सर बोलावण्यात आल्या आहेत. या गाण्यात शाहरुख खानसोबत एक हजाराहून अधिक मुली डान्स करताना दिसणार आहेत.

‘जवान’ मध्ये मुख्य अभिनेता असण्यासोबतच शाहरुख खान या चित्रपटाचा निर्माताही आहे. हा चित्रपट त्याच्या प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत बनवला गेला आहे. हा चित्रपट हिट होण्यासाठी शाहरुख खानने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. सूत्रांनुसार, ‘जिंदा बंदा’ गाणे रुपेरी पडद्यावर प्रभावी करण्यासाठी 15 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, जे बॉलिवूड उद्योगाच्या इतिहासातील सर्वात महागडे गाणे आहे. आधी कोरोना मग ब्रेनस्ट्रोक-पॅरालिसिसची ठरली बळी; गंभीर आजारावर मात करत शाहरुखच्या अभिनेत्रीचं कमबॅक शाहरुख खानचा ‘जवान’ हा एक पॅन इंडियन चित्रपट आहे, ज्यामध्ये दक्षिण सिनेमाचा धन्सू अभिनेता विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात दोघेही आमनेसामने दिसणार आहेत. अलीकडेच किंग खानने ‘जवान’ चित्रपटातील विजय सेतुपतीचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामध्ये तो दमदार स्टाईलमध्ये दिसत होता. तिथेच. नयनतारा, सान्या मल्होत्रा, प्रियामणी आणि रिद्धी डोग्रा या अभिनेत्रीही या चित्रपटाचा एक भाग आहेत. दीपिका पदुकोण ‘जवान’मध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे, ज्याची झलक चित्रपटाच्या प्रिव्ह्यूमध्ये दिसली आहे.

संबंधित बातम्या

रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान ‘जवान’ चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणार आहे. तो पिता-पुत्राच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान सहा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार असल्याचेही सांगितले जात आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अद्याप लॉन्च करण्यात आलेला नसला तरी प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर किंग खानचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. शाहरुख खानचा ‘जवान’ 7 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या