शबाना आझमी यांचं पती जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीसोबत कसं आहे नातं?
मुंबई, 1 जून- बॉलिवूडमध्ये अशी काही जोडपी आहेत ज्यांच्याकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं.त्यातीलच एक नाव म्हणजे जावेद अख्तर आणि शबाना आझमी होय. या दोघांची जोडी अनेकांना पसंत पडते. परंतु फारच काहींना माहिती नसेल की, शबानासोबत लग्न करण्यापूर्वी जावेद यांनी पहिलं लग्न केलं होतं. त्यांच्या पहिल्या पत्नी हनी अख्तर-ईरानी आहेत. त्या नेहमीच लाइमलाईटपासून दूर राहतात. या दोघांना फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही दोन अपत्ये आहेत. दरम्यान आता इतक्या वर्षानंतर
शबाना आझमीं
नी सवत हनीबाबत खुलासा करत सर्वानांच चकित केलं आहे. पाहूया या ज्येष्ठ अभिनेत्रींनीं नेमकं काय म्हटलंय. गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांनी 1983 मध्ये लग्नगाठ बांधली होती. या दोघांचा सुखाचा संसार सुरु आहे. मात्र बऱ्याच वेळा चाहत्यांना जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबाबत अनेक प्रश्न पडत असतात. शिवाय शबाना आझमींचं त्यांच्या सवतीसोबत कसं नातं आहे? असंही अनेकांना जाणून घ्यायचं असतं. अशातच आता शबाना आझमींनी स्वतः याबाबत मौन सोडत भाष्य केलं आहे. (हे वाचा:
Ashish Vidyarthi: साठीत आशिष विद्यार्थी कसे पडले रुपालींच्या प्रेमात? कुठे झालेली भेट? समोर आलं पत्नीचं वय
) शबाना आझमी या 70-80 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी जवळपास सर्वच बड्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. शबाना आझमी नेहमीच आपलं आयुष्य खाजगी ठेवणं पसंत करतात. त्या फारच कमी वेळा आपल्या वैवाहिक आयुष्यावर भाष्य करतात. दरम्यान आता त्यांनी थेट आपल्या सवतीबाबत सांगत सर्वांना चकित केलं आहे. शबाना आझमी यांनी या मुलाखतीत जावेद अख्तर याची पहिली पत्नी आणि अभिनेता फरहान अख्तरची आई हनीसोबत आपलं नातं कसं आहे? याचा खुलासा केला आहे. नुकतंच फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना शबाना आझमींनी सांगितलं की, ‘सर्वात आधी हनी आणि जावेद यांच्या मुलांसोबत त्यांचं नातं विश्वास आणि मैत्रीवर आधारित आहे. याचं संपूर्ण श्रेय हनीला जातं. त्यांनी पुढे सांगितलं की, आमचं नातं खूपच मैत्रीपूर्वक आहे. आम्ही खूप प्रेमाने राहतो. त्यांच्यासोबत माझं नातं फारच सुंदर आहे. मी फरहान आणि झोयाला खूप मानते. मला माहितेय की, ते माझा प्रचंड आदर करतात. याचंही श्रेय हनीला जातं. त्या एक खूपच समजूतदार आणि मोठ्या विचारांच्या महिला आहेत’.
शबाना आझमी यांनी पुढे सांगितलं की, ‘फरहान आणि झोया माझ्यासोबत इतके चांगले आहेत त्याचं मुख्य कारण आहे हनी. कारण जर त्यांनी ठरवलं असतं तर, त्यांनी मुलांना माझ्यापासून दूर ठेवलं असतं. परंतु त्यांनी असं अजिबात केलं नाही. त्यामुळेच मी आवर्जून सांगू इच्छिते की, हनी एक समजूतदार आणि खूपच चांगली व्यक्ती आहे. तसेच मी तिचे आभार मानू इच्छिते कारण तिच्यामुळे मुलांसोबत माझं नातं इतकं सुंदर आहे. आणि स्वतःहनीसोबतही माझं नातं फारच छान आहे’.