मुंबई, 06 ऑक्टोबर : बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि स्क्रिनप्ले रायटर जावेद अख्तर यांना आज सिने इंडस्ट्रीमध्ये 55 वर्ष पूर्ण करत आहेत. 1964मध्ये जावेद यांनी मुंबईमध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं. सध्याच्या घडीला ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक आहेत. जावेद यांनी सलमान खानचे वडील सलीम खान यांच्यासोबत 70 आणि 80 च्या दशकात अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांचे संवाद लिहिले. आणि काही सुपरहिट सिनेमांच्या कथाही लिहिल्या. ज्यात शोले, जंजीर सारख्या सिनेमांचा समावेश आहे. जावेद यांच्या पत्नी शबाना आझमी यांनी ट्विटरवर जावेद यांच्या स्ट्रगलिंग काळाविषयी लिहिलं आहे. शबाना यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, आजच्या दिवशी 55 वर्षांपूर्वी एक 19 वर्षीय मुलगा मुंबईमध्ये आला होता. खिशात फक्त 27 रुपये आणि डोळ्यात असंख्य स्वप्न घेऊन जावेद फुटपाथवर झोपले. 4-4 दिवस उपाशी राहिले पण त्यांना त्यांच्या कामावर विश्वास होता. ही समस्यांसमोर हार न मानणाऱ्या व्यक्तीची प्रेरणादायी कथा आहे. मी तुमचा खूप आदर करते. सुनील शेट्टीची लेक करतेय केएल राहुलला डेट? सोशल मीडियावर PHOTO VIRAL
जावेद अख्तर आणि शबाना आझमी हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा फरहान आणि मुलगी झोया यांनी सुद्धा बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शबाना यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर त्या लवकरच ‘शिर कुर्मा’ मध्ये दिसणार आहे. या सिनेमाची कथा समलैंगिक प्रेमावर आधारित आहे. या सिनेमात शबाना यांच्या व्यतिरिक्त स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत.
VIDEO : शूटिंग दरम्यान हारनेसवर बेशुद्ध झाला कॉमेडियन, अक्षय कुमारनं वाचवला जीव
‘शिर कुर्मा’ या सिनेमाचं दिग्दर्शन फराज अन्सारी करत असून जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी या सुद्धा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी शबाना आझमी अभिनेत्री जुही चावलासोबत एका सिनेमात दिसल्या होत्या या सिनेमाचं नाव ‘चॉक डस्टर’ असून या सिनेमात त्यांनी शाळेतील गणिताच्या शिक्षिकेची भूमिका साकारली होती.
Navratri 2019 : गरबा फेम फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर थिरकली देसी गर्ल प्रियांका
================================================================= VIDEO : अंग गोठवणाऱ्या थंडीत वर्षभर राहणाऱ्या नवदुर्गेचा अनुभव