JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रसिद्ध अभिनेत्रीचा 22 व्या मजल्यावरून पडून मृत्यू , हत्या की आत्महत्या याबाबत सस्पेन्स!

प्रसिद्ध अभिनेत्रीचा 22 व्या मजल्यावरून पडून मृत्यू , हत्या की आत्महत्या याबाबत सस्पेन्स!

जपानची प्रसिद्ध अभिनेत्री (Japanese Actress) सायाका कांडा (Sayaka Kanda Death) हिचा २२व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई. 21 डिसेंबर-जपानची प्रसिद्ध अभिनेत्री (Japanese Actress) सायाका कांडा (Sayaka Kanda Death) हिचा २२व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. सायाका होक्काइडो(Hokkaido) बेटावरील एका हॉटेलमध्ये थांबली होती. त्याच हॉटेलच्या 22व्या मजल्यावर असलेल्या खोलीतून पडल्यानंतर त्याचा अपघाची मृत्यू झाला. अभिनेत्रीच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सायाका कांडा ही 35 वर्षांची होती. 18 डिसेंबरच्या रात्री उंचावरून पडल्यानंतर सायाका या हॉटेलच्या बाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.रिपोर्ट्सनुसार, सायाकाची रूम हॉटेलच्या 22व्या मजल्यावर होती. तेथून ती खाली पडली, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांचे सर्व प्रयत्न करूनही अभिनेत्रीला वाचवता आले नाही.स्थानिक वृत्तसंस्थेने तिच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. एजन्सीने एक निवेदन जारी केले आहे की, अभिनेत्री सायाका कांडा ही अपघाताची बळी ठरली आहे. सायका आता आपल्यात नाही. वाचा- जॅकलिनच्या सुपरहिरो चित्रपटासाठी 500 कोटींची गुंतवणूक करणार होता सुकेश चंद्रशेखर सायाका कांडा कोण आहे? सायाका ही जपानी अभिनेत्री आणि गायिका होती. ती अभिनेता मासाकी कांडा (Masaki Kanda) आणि पॉप गायक सेको मत्सुदा( Seiko Matsuda) यांची एकुलती एक मुलगी होती. डिस्नेच्या (Disney ) फ्रोझन (Frozen) चित्रपट सीरिजमध्ये अन्नाचे पात्र जपानी भाषेत डब करण्यासाठी सायाका प्रसिद्ध आहे. वाचा- स्पोर्ट्स ब्रा आणि जॅकेटमध्ये Rhea Chakraborty चा सुपरहॉट अंदाज; पाहा VIDEO सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सध्या हे प्रकरण ‘संभावित आत्महत्या’ म्हणून तपासले जात आहे. मात्र, कोणताही कट असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दुसरीकडे, सायकाचे जवळचे आणि चाहते ती आत्महत्या करू शकते यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या