जान्हवी कपूर
मुंबई, 4 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा चित्रपट ‘मिली’मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट आज प्रदर्शित झाला असला तरी, गुरुवारी संध्याकाळी मुंबईत एक विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती. या स्किनिंगला अभिनेत्री रेखा, जान्हवीच्या मैत्रिणी सारा अली खान आणि अनन्या पांडे तसेच तिचा अफवा असलेला प्रियकर ओरहान अवत्रामणीही उपस्थित होता. यावेळी ओरहाननं जान्हवी कपूरचे वडिल आणि या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूरला मिठी मारल्याची पहायला मिळाली. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. जान्हवी कपूरच्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचलेल्या ओहरामने म्हणजेच जान्हवीच्या कथित बॉयफ्रेंडने बोनी कपूरला मिठी मारली. या फोटोनं सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूल घातला आहे. याशिवाय जान्हवीच्या बेस्टीज अनन्या आणि साराही स्टाईलमध्ये स्किनिंगला पोहचल्या. अनन्या पांडेने निळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केली होती, तर सारा अली खानने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप फ्लॉंट केलेला पहायला मिळाला. हेही वाचा - HBD Milind Soman: ‘न्यूड फोटोशूट, 26 वर्ष लहान मुलीशी लग्न’; मिलिंद सोमण या गोष्टींमुळे राहिलाय चर्चेत जान्हवी कपूरचा चित्रपट ‘मिली’ 4 नोव्हेंबर 2022 रोजी म्हणजेच आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे जान्हवीचा हा पहिलाच चित्रपट आहे, ज्यामध्ये ती तिच्या वडिलांसोबत काम करत आहे. तिचे वडील बोनी कपूर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे जान्हवीच्या या चित्रपटासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट लोकांना किती आवडेल आणि किती कमाई करेल हे येणारा काळच सांगेल.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ती अनेक फोटो आणि मजेदार व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. जान्हवी नेहमीच तिच्या नवनवीन फॅशनने चाहत्यांना हैराण करताना दिसते. अनेकवेळा तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतही हॅगआऊट करताना पहायला मिळते.
जान्हवीने आत्तापर्यंत मोजकेच चित्रपट केले आहेत, पण तिची लोकप्रियता खूप जास्त आहे. जान्हवी आगामी चित्रपट जन गन मन मध्येही दिसणार आहे. ज्यामध्ये ती दक्षिण स्टार विजय देवरकोंडा आणि पूजा हेगडे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त जान्हवीकडे करण जोहरचा दोस्ताना 2 हा चित्रपटही आहे. जान्हवी शेवटची गुड लक जेरी या चित्रपटात झळकली होती.