JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Janhvi Kapoor: 'आई मला बाथरुमचा दरवाजा...'; जान्हवी कपूरने सांगितला श्रीदेवीचा 'तो' किस्सा

Janhvi Kapoor: 'आई मला बाथरुमचा दरवाजा...'; जान्हवी कपूरने सांगितला श्रीदेवीचा 'तो' किस्सा

जान्हवी कपूर अनेकदा तिच्या आईशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने चाहत्यांसोबत कधीही न ऐकलेला श्रीदेवी यांचा किस्सा शेअर केला आहे.

जाहिरात

जान्हवी कपूर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 नोव्हेंबर : बॉलिवूड ब्युटी जान्हवी कपूरने आता चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून बरेच वर्ष उलटले असले तरी  तिची ओळख अजूनही श्रीदेवीची मुलगी अशीच आहे. ती कायम नेहमीच चर्चेत असते. तिची आई म्हणजेच श्रीदेवी हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री होत्या. जान्हवी कपूर अनेकदा तिच्या आईशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहत्यांनाही या गोष्टी ऐकायला आवडतात. जान्हवीने नुकतेच स्वतःचे घर विकत घेतले आहे. घराची आठवण काढत तिने चाहत्यांसोबत कधीही न ऐकलेला श्रीदेवी यांचा किस्सा शेअर केला आहे. फॅशन मॅगझिन वोग इंडियाने जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या चेन्नईतील घराचा प्रत्येक कोपरा दाखवताना दिसत आहे. यादरम्यान जान्हवीने श्रीदेवीची त्या घरातील आठवण शेअर केली. जान्हवी कपूरने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की तिच्या चेन्नईतील घराच्या बेडरूममधील बाथरूमला, जे एकेकाळी तिच्या आईचे होते त्याला अजूनही लॉक करत नाही. या होम टूर व्हिडिओमध्ये तिने तिची शयनकक्ष टीव्ही रूम जिथे ती तिची बहीण खुशी सोबत जास्त वेळ घालवते, तिचे जिम क्षेत्र, बाथरूम, घराचा तिचा ‘आवडता कोपरा’ आणि जेवणाची खोली दाखवली आहे. हेही वाचा - TMKOC: ‘हे सगळं खोटं…’; अपघाताच्या बातमीनंतर चंपक चाच्यांनी सांगितलं सत्य या व्हिडिओमध्ये  जान्हवी कपूर घराच्या जुन्या आठवणी सांगताना म्हणते कि, ‘मला या घरात आईसोबत घातलेले ते सगळे क्षण आठवतात. या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत.  जसे की, माझ्या खोलीच्या बाथरूममध्ये, दरवाजाला कुलूप नाही. मला आठवते की माझ्या आईने कुलूप लावण्यास नकार दिला होता.  कारण ती खूप घाबरली होती की मी बाथरूममध्ये जाऊन मुलांशी बोलेन. त्यामुळे मला माझ्या बाथरूमला कुलूप लावण्याची परवानगी नव्हती. आता ही माझी पूर्ण खोली आहे… पण माझ्या बाथरूमला अजूनही कुलूप नाही…"

संबंधित बातम्या

जान्हवीचा हा खुलासा ऐकून चाहते चांगलेच थक्क झाले आहेत. यासोबतच तिने या घरातील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. तिने या व्हिडिओमध्ये घरातील एक सुंदर मेमरी वॉल दाखवली, ज्यात श्रीदेवीचे तिच्या कुटुंबासह सुट्टीतील फोटो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचे फोटो होते. जान्हवी कपूरने आईची अजून एक आठवण सांगितली ती म्हणजे  जेव्हा तिचे वडील बाहेर जायचे तेव्हा ती आणि तिची आई श्रीदेवी बोनी कपूरच्या येण्याच्या एक-दोन दिवस आधी चेन्नईला जायची. तेव्हा ती घराला फुलांनी सजवायची. वडिलांच्या जेवणातील सर्व आवडत्या पदार्थ तयार करायची.

जान्हवी कपूरने सांगितलेल्या या गोष्टींवर चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. जान्हवीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर ती नुकतीच ‘मिली’ या  चित्रपटात दिसली आहे. हा एक सर्व्हायव्हल थ्रिलर-ड्रामा होता, ज्यामध्ये जान्हवी कपूरच्या अभिनयाचं  सध्या कौतुक होत आहे. चित्रपटात जान्हवी कपूर एका कोल्ड स्टोरेजमध्ये अडकते, जिथे ती जगण्यासाठी संघर्ष करताना दिसते. जान्हवी कपूरला या चित्रपटासाठी -17 डिग्री तापमानात शूट करावे लागले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या