JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Janhavi Kapoor: माजी मुख्यमंत्र्यांची नातसून बनणार जान्हवी कपूर?वडील आणि बॉयफ्रेंडसोबत दिसली अभिनेत्री

Janhavi Kapoor: माजी मुख्यमंत्र्यांची नातसून बनणार जान्हवी कपूर?वडील आणि बॉयफ्रेंडसोबत दिसली अभिनेत्री

Janhavi Kapoor-Shikhar Pahariya Relationship: अलीकडे जान्हवी आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत सतत दिसून येत आहे. त्यामुळे या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान जान्हवी पुन्हा एकदा शिखर पहाडियासोबत व्हेकेशनवर जाताना दिसून आली.

जाहिरात

जान्हवी कपूर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 मार्च- बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असते. जान्हवीने फारच कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची लेक असणाऱ्या जान्हवीने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. दरम्यान अभिनेत्री सतत आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते.अलीकडे जान्हवी आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत सतत दिसून येत आहे. त्यामुळे या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान जान्हवी पुन्हा एकदा शिखर पहाडियासोबत व्हेकेशनवर जाताना दिसून आली. जान्हवी कपूर बॉलिवूडमधील एक ओळखीचा चेहरा आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. चित्रपट, स्टाईल, लुक्स आणि लव्ह लाईफ या प्रत्येक गोष्टींमुळे जान्हवी सतत चर्चेत असते. जान्हवी कपूरच्या रिलेशनशिप स्टेट्सबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. जान्हवीचं नाव अनेकवेळा ओरीसोबत जोडलं जात होतं . मात्र ते दोघे फक्त चांगले मित्र असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान जान्हवी कपूर आता पुन्हा एकदा आपल्या एक्स-बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (हे वाचा: Kartik Aaryan: प्रेमात आहे कार्तिक आर्यन? अभिनेत्याचा रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा ) जान्हवी सतत एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत फिरताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यातसुद्धा जान्हवी कपूर शिखर पहाडियासोबत सहभागी झाली होती. तसेच अनेकवेळा कारमधून जाताना आणि पार्ट्या करतांना या दोघांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे. आता पुन्हा एकदा जान्हवी आणि शिखरला विमानतळावर पाहण्यात आलं. विशेष म्हणजे या दोघांसोबत बोनी कपूरसुद्धा होते. त्यामुळे वडिलांनी जान्हवी आणि शिखरच्या नात्याला मंजुरी दिल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या

विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर जानवी कपूरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती कारमधून उतरून विमानतळाच्या आत जाताना दिसून येत आहे. तिच्यासोबत वडील बोनी कपूर आणि बॉयफ्रेंड शिखर पहाडियासुद्धा आहे. हे तिघे जान्हवीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विदेशात जात असल्याचं म्हटलं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी जान्हवी कपूर शिखर पहाडियासोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु काही काळाने त्यांचा ब्रेकअप झाला होता. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेचा नातू आहे. जान्हवीसोबतच्या रिलेशनशिपमुळे तो प्रचंड चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे ब्रेकअपनंतर इतक्या वर्षांनी पुन्हा एकत्र फिरत असल्याने हे दोघे पुन्हा रिलेशनशिपमध्ये आल्याचं म्हटलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या