JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / जॅकलिननं शेअर केले बेडरुम सेल्फी, फोटोमध्ये दिसला आतापर्यंतचा सर्वात BOLD लुक

जॅकलिननं शेअर केले बेडरुम सेल्फी, फोटोमध्ये दिसला आतापर्यंतचा सर्वात BOLD लुक

जॅकलिन फर्नांडिसनं बेडरुममधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती सर्वात बोल्ड अवतारात दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 जून : सध्या कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे घरी असलेले बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ते सतत चाहत्यांशी संवाद साधतात दिसत आहेत. याशिवाय सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ सुद्धा शेअर केले जातयत. ज्यामुळे ते सतत चर्चेत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सुद्धा अशाच काही कारणानं सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावर खूपच बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. जॅकलिन फर्नांडिसनं तिच्या इन्स्टाग्रामवर बेडरुममधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती सर्वात बोल्ड अवतारात दिसत आहे. या फोटोंमध्ये जॅकलिननं तिच्या मागे असलेल्या खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशात फोटो क्लिक केले आहेत. ज्यात तिनं खूपच बोल्ड पोझ दिल्या आहेत. हे फोटो शेअर करताना तिनं लिहिलं, ‘राइझ अँड शाइन’ तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. राजेश खन्नांच्या गाण्यावर स्वतःला रोखू शकल्या नाहीत डिंपल, पाहा डान्स Video

जॅकलिनचा हा बोल्ड अवतार पाहून तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. सोशल मीडियावर हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोंवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. तिच्या बोल्डनेसमुळे अनेकजण घायाळ झाले आहेत. तर अनेकांनी तिच्या कॅप्शनच कौतुक केलं आहे. जॅकलिनला बॉलिवूडमध्ये आता जवळपास 11 वर्षं झाली आहेत. तिनं 2009 मध्ये अलादीन सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमानंतर तिनं अनेक हिट सिनेमे दिले. काही दिवसांपूर्वीच ती सलमान खानच्या ‘तेरे बिना’ या अल्बम साँगमध्ये दिसली होती. याशिवाय लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर ती फिटनेसचे धडे देताना दिसत आहे. अभिनेता चिरंजीवी सरजा यांचं 2 वर्षांपूर्वीच झालं होतं लग्न, पत्नी आहे प्रेग्नन्ट लॉकडाऊनमध्ये रसिका सुनीलनं केलं BOLD फोटोशूट, हॉट लुकवर चाहते फिदा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या