मुंबई, 28 एप्रिल- भोजपुरी गायिका शिल्पी राज (Bhojpuri Singer Shilpi Raj) अलीकडेच तिचा एमएमएस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांगलीच चर्चेत आली होती. नुकताच जेव्हा शिल्पीचा व्हिडिओ लीक झाला होता, त्यावेळी तो व्हिडिओ शेअर करू नका, असं आवाहन शिल्पीने चाहत्यांना केलं होतं. दरम्यान, शिल्पीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्याबद्दलची माहिती आणि तिची गाणी मोठ्या प्रमाणात शोधली जाऊ लागली. लोकांना जाणून घ्यायचं होतं की शिल्पी राज कोण आहे? (Who is Shilpi Raj) तिचा व्हिडिओ कसा लीक झाला?, यामागे कोणाचा हात आहे, असे बरेच प्रश्न उपस्थित होत होते. दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणानंतर शिल्पीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. ‘जेव्हा MMS स्कँडल पहिल्यांदा सोशल मीडियावर दिसलं, तेव्हा तू कुठे होतीस आणि तुझ्या फोनमधून हा MMS कोणी व्हायरल केला?’, असं विचारलं असता शिल्पी म्हणाली, ‘प्रामाणिकपणे सांगतेय, मी MMS पाहिलेला नाही. माझ्या नावाचा वापर करून हा एमएमएस सोशल मीडियावर (Social Media) टाकण्यात आला होता. एमएमएसमधील मुलगी कोण आहे, हे मला माहीत नाही. या व्हिडीओत दिसणारी मुलगी मी नाही. कोणी तरी मला बदनाम करण्यासाठी हा कट रचलाय,’ असा आरोपही शिल्पीने केलाय. ‘यामागे कोण असू शकतं, तुला कोणावर संशय आहे का?,’ यावर शिल्पी सांगते, ‘नाही, हे कोणी केलंय, याबद्दल मला तरी अजून माहिती नाही. असंही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा कोणी प्रगती करत असतं, तेव्हा लोक बरं-वाईट बोलत असतात. महिलांचा कोणीही आदर करत नाही.’ याबद्दल तू पोलिसांकडे का तक्रार करत नाहीस?, असं विचारल्यावर कोर्टात केस सुरू असल्याचं तिने सांगितलं. ‘आम्ही कोर्टात केस दाखल केली आहे. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याशिवाय किंवा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्याशिवाय कोणत्याही व्हिडिओवर कोणाचंही नाव लावणं चुकीचं आहे. दरम्यान, हे प्रकरण घडल्यानंतर मी कोणत्याही मीडियाला दिलेली ही पहिलीच मुलाखत आहे. तुला इंडस्ट्रीमधून कोणाचे फोन आले नाहीत का, असं विचारलं असता शिल्पीने नकार दिला. अजिबात नाही. मला इंडस्ट्रीमधून आलेले सर्व कॉल माझे मॅनेजर अभय पांडे यांच्याकडे जातात.’ या प्रकरणानंतर पालकांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलं असता शिल्पी सांगते, ‘हे घडल्यानंतर माझा भाऊ चिंतेत होता आणि त्याने काळजीपोटी मला कॉल केला; पण मी त्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या.’ दरम्यान, तुझी आवडती गाणी कोणती, असं विचारलं असता ‘भोजपुरी लोकगीतं (folk songs) हीच माझी आवडती गाणी आणि माझी ओळख आहे, ही गाणी खेड्यापाड्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत,’ असं शिल्पीने सांगितलं. बॉलिवूडमध्ये जाणं हे तुझं अंतिम लक्ष्य आहे का? या प्रश्नावर शिल्पी म्हणाली, ‘मला बॉलिवूडमध्ये गायला नक्कीच आवडेल. पण मी काम मिळवण्यासाठी चित्रपट निर्मात्यांकडे जात नाही, कारण तुम्ही ज्या कामासाठी ओळखले जाता, तेच काम तुम्हाला मिळतं. असंही सध्या मी भोजपुरीमध्ये खूप चांगलं काम करत आहे आणि संगीत कंपन्या मला चांगली गाणी देत आहेत. त्यामुळे मी आतापर्यंत केलेल्या कामातून माझं भविष्य घडेल,’ असा विश्वास शिल्पीने व्यक्त केला.
कोण आहे शिल्पी राज? शिल्पी राज ही मूळची उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्यातील आहे. 2017 मध्ये “भुकुर भुकुर लाइट बरम करेजौ…” हे गाणं व्हायरल झाल्यानंतर शिल्पी लोकप्रिय झाली. तिने पवन सिंग, खेसारी लाल यादव, अरविंद अकेला यांसारख्या स्टार्ससोबत काम केलं आहे. अलीकडेच तिचा एमएमएस व्हायरल झाल्यानं ती चर्चेत आली होती.