मुंबई,1 जुलै- आपल्या देशात अनेक रसिक लोक आहेत. ज्यांना कलेबाबत प्रचंड प्रेम आणि आदर आहे. अनेक लोक सतत गाणी ऐकत आणि गुणगुणत असतात. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये चक्क आय.टी.बी. पी. जवान (ITBP) मधुर आवाजात गाणं गाताना दिसून येत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळत आहे. गायन आणि संगीताची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ‘कोक स्टुडिओ’बाबत माहिती असेलच. कोक स्टुडिओची बरीच गाणी लोकप्रिय झालेली पाहायला मिळतात. नुकतंच या शोच्या 14 व्या सीजनमध्ये एक गाणं गाण्यात आलं होतं. जे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ते गाणं आहे ‘पसूरी’. सोशल मीडियावर या गाण्यावर अनेक व्हिडीओ आणि रील बनवण्यात आले आहेत. परंतु यापूर्वी सीजन 9 मध्ये राहत फतेह अली खान आणि मोमिना मुस्तहसन यांनी ‘आफरीन-आफरीन’ हे गाणं गायिलं होतं. हे गाणं प्रचंड लोकप्रिय आलं होतं. आजही हे गाणं तितक्याच आवडीने गुणगुणलं जातं. सध्या सोशल मीडियावर याच गाण्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
(हे वाचा: श्रुती हसन बॉयफ्रेंड शंतनूसोबत कधी करणार लग्न? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा ) यामध्ये आय.टी.बी. पी. जवान म्हणजेच भारत-तिबेट सीमा पोलीस कॉन्स्टेबल विक्रम जीत यांनी हे गाणं इतक्या सुंदररित्या गायिलं आहे, की सर्वजण त्यांची वाहवाह करत आहेत. त्यांच्या आवाजात हे गाणं पुन्हा-पुन्हा ऐकलं जात आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचा कॉन्स्टेबल मित्र सुंदर पद्धतीने गिटार वाजवताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ ट्रेंड करत आहे.