मुंबई, 18 जून : आपल्या दर्जेदार अभिनयाने आणि प्रेमळ स्वभावाने सर्वांचीच मने जिंकणारा सुशांत सिंह रजपूत याच्या निधनाला अनेक दिवस उलटले. मात्र त्याचं नसण्याने अनेकांच्या आयुष्यात एक न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे. सेटवर असो व कोणत्याही कार्यक्रमात तो अत्यंत जिव्हाळ्यांना सर्वांना भेटायचा. अगदी रस्त्यावर फुगे विकणाऱ्यासोबत आवर्जुन फोटो काढून घ्यायचा. त्याच्या जाण्याने बॉलिवूडमधील एका चांगला माणूस गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यादरम्यान त्याच्या घरातील त्याचा लाडका कुत्रा मात्र सुशांतच्या निधनाचं दु:ख सहन करू शकत नाही. सुशांतने लॅब जातीचा कुत्रा पाळला होता. या कुत्र्यासोबत त्याचं अत्यंत भावनिक नातं होतं. तो याच्यासोबत खूप खेळायचां. मस्ती करायचा..त्याला प्रेम करायचा…मात्र गेल्या 4 दिवसांपासून आपल्या मालकाचा स्पर्श न झाल्याने तो उदास झाला आहे. सुशांतचा कुत्रा सतत त्याचा फोटो जवळ घेऊन बसलेला असतो. तो काही खात नसल्याचंही सांगितलं जात आहे.
आज देशातील त्याच्या चाहत्यांबरोबर हे मूक जनावरही सुशांतच्या आठवणीत रडत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतनं रविवारी 14 जूनला त्याच्या मुंबईतल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. नेहमीच हसतमुख आणि एनर्जेटिक राहणाऱ्या या अभिनेत्यानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न सर्वांना पडला आहे. हे वाचा- VIDEO :चाहत्यांच्या मनात तू कायम जिवंत राहशील; सुशांतच्या अस्थींचं गंगेत विसर्जन संपादन - मीनल गांगुर्डे