लग्नाच्या चार महिन्यात Kiara Advani प्रेग्नेंट?
मुंबई, 25 जून- बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.ती कार्तिक आर्यनसोबत ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहे. लग्नानंतर कियारा लगेचच कामावर परत रूजु झाली आहे. ती सध्या तिच्या सिनेमाच्या प्रमोशनामध्ये बिजी आहे. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये नेटकऱ्यांनी तिला प्रेग्नेंसीबद्दल विचारलं आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी शनिवारी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पिंक सिटी जयपूरला पोहोचले होते. दरम्यान, सोशल मीडियावर कियाराचा एक फोटो व्हायरल झाला आहे. जो पाहिल्यानंतर कियाराचे चाहते खुश झाले आहेत तर काहीजण तिच्याकडे गुडन्यूज असल्याचा अंदाज लावत आहेत. कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कियारासोबत दिसत आहे. कियाराने मॅचिंग ब्लेझर आणि केशरी रंगाची पँट घातलेली दिसते. मोकळे केस आणि गोंडस हास्य तिच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करत होते. तर, कार्तिक पांढरा टी-शर्ट, तपकिरी जॅकेट आणि निळ्या जीन्समध्ये नेहमीप्रमाणेच देखणा दिसत आहे. तथापि, नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले ते फोटोमधील कियाराचे पोट, जे बेबी बंपसारखे दिसते. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली. वाचा- बॉलिवूडपासून दूर तरीही ‘या’ बिझनेसमधून कोट्यवधी कमावते करिश्मा कपूर या पोस्टच्या कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी लिहिलं आहे की, ‘कियारा प्रेग्नंट आहे का?’ तर दुसऱ्याने लिहिलं की, ‘आपण सर्वजण बेबी बंप पाहू शकतो, नाही का?’ तर काहींनी सिद्धार्थ मल्होत्राची देखील खिल्ली उडवली आहे. या फोटोत बहुतेकांना तिचा बेबी बंप दिसत आहे.तथापि, कियारा गर्भवती आहे की नाही. हे तर कियाराच तिच्या चाहत्यांना सांगू शकेल. कियारा आणि सिद्धार्थ यांनी 7 फेब्रुवारीला राजस्थानमध्ये लग्न केले.
कार्तिक आर्यन आणि कियारा ‘भूल भुलैया’च्या यशानंतर आता ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटातुन प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. त्यांचा हा चित्रपट 29 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात कार्तिक-कियाराशिवाय सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तलसानिया हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे सध्या बॉलिवूडमधील सर्वात आवडते रिअल लाईफ जोडपे आहे. ओटीटी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘शेरशाह’च्या शूटिंगदरम्यान हे जोडपे प्रेमात पडले. काही वर्षे आपले नाते सर्वांपासून लपवून या जोडप्याने 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्न केले. लग्नानंतर तिने तिचे लग्नाचे फोटो शेअर करताच ते व्हायरल झाले. एवढेच नाही तर सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नातील छायाचित्रे हे आतापर्यंतचे सर्वाधिक पसंतीचे सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटो बनले आहेत.