JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / दिवंगत अभिनेते इरफान खानच्या लेकाचं सिनेसृष्टीत पदार्पण; 'काला'च्या ऑडिशनवेळी झाली होती वाईट अवस्था

दिवंगत अभिनेते इरफान खानच्या लेकाचं सिनेसृष्टीत पदार्पण; 'काला'च्या ऑडिशनवेळी झाली होती वाईट अवस्था

दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. बाबिल खानला अभिनय करताना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 ऑगस्ट: हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या अकाली जाण्यानं सर्वांना मोठा धक्का बसला होता. 2020मध्ये अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेते इरफान खान यांच्या अकाली निधन सर्वांना चटका लावून जाणारं होतं.  या दोन्ही दिग्गजांना प्रेक्षक आणि सिनेसृष्टी कधीच विसरू शकत नाही. अभिनेते इरफान खान यांचं नाव सध्या चर्चेत आलं आहे. त्याच कारणही तसंच आहे. इरफान खान यांचा मोठा मुलगा बाबिल खान सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘काला’ या सिनेमामध्ये बाबिल प्रेक्षकांना दिसणार आहे.  इरफान खान यांच्यानंतर त्यांचा मुलगा सिनेसृष्टीत येईल अशा चर्चा होत्या मात्र आज त्यावर शिक्का मोर्तब झाला आहे. सिनेमातील एका गाण्याचा टीझर समोर आला आहे ज्यात एक मुलगी गाणं गाताना दिसत आहे. हा BTS व्हिडीओ आहे मात्र त्यात कुठेही बाबिल दिसत नाहीये. ‘काला’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. यात बाबिल खानबरोबर तृप्ती डिमरी, स्वस्तिका मुखर्दी आणि अमित सियाल हे कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहे. वेब सीरिजचं दिग्दर्शन अन्विता दत्त यांचं आहे. सिनेमाच एक खास इव्हेंट ठेवण्यात आला होता.  यावेळी मीडियाशी संवाद साधताना बाबिल याने सिनेमाच्या ऑडिशनविषयी गप्पा मारल्या. हेही वाचा - Sonam Kapoor: सोनम कपूरच्या बाळाचं नाव आलं समोर, VIDEO मुळे झाला खुलासा बाबिल खान यावेळी म्हणाला, मी काला सिनेमाचं ऑडिशन देत होतो तेव्हाच बाबांचं निधन झालं होतं. ऑडिशनवेळी फार निराश झालो होतो. काला या सिनेमाचं स्क्रिप्ट वाचण्याआधीच मी सिनेमात काम करायला तयार झालो होतो.  पण त्याच काळात बाबा गेल्यानं मी बिथरुन गेलो त्यामुळे ऑडिशनच्या वेळी प्रचंड निराश झालो होतो.

बाबिल पुढे म्हणाला, ‘सिनेमाची दिग्दर्शिका अन्विता माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे.  त्यामुळे सिनेमाची स्क्रिप्ट वाचण्याआधीच मी सिनेमा करण्यासाठी तयार झालो होतो.  माझ्या डोक्यात या सिनेमाशिवाय कोणतेच विचार नव्हते. मी ऑडिशन द्यायलाही तयार झालो.  पण ही तिच वेळ होती जेव्हा बाबांचं निधन झालं आणि मी पूर्णपणे तुटून गेलो’. तो पुढे म्हणाला, ‘बाबा गेले आणि काही दिवसांनी मी शुटींगसाठी सेटवर गेलो तेव्हा तिथे माझं अनेकांनी सात्वंन केलं मला सुरक्षित वाटेल अशा पद्धतीनं माझ्याशी वागले.  मी माझं काही सामान घेऊन तिथं गेलो होतो प्रचंड खाबरलो होतो. अन्वितानं माझी फार काळजी घेतली.  मी या सगळ्यांचे आभार नाही मानणार पण त्यांनी माझ्यासाठी जे केलं ते फार अनमोल होतं’. दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या मुलाला अभिनय करताना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. पण सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अजून समोर आलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या