JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर पद्मश्री वेंडेल रॉड्रिक्स यांचं निधन

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर पद्मश्री वेंडेल रॉड्रिक्स यांचं निधन

प्रामुख्यानं फॅशन डिझाईनमध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल वेंडेल यांना केंद्र सरकारने 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गोवा, 12 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर पद्मश्री वेंडेल रॉड्रिक्स यांचं निधन झालं. ते 59 वर्षाचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे वेंडेल रॉड्रिक्स यांची राहत्या घरी प्राणज्योत मालवली. प्रामुख्यानं फॅशन डिझाईनमध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल वेंडेल यांना केंद्र सरकारने 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 28 मे 1960 रोजी जन्मलेल्या वेंडेलचे शिक्षण मुंबई माहिमच्या सेंट मायकेल हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर फॅशन डिझाईन शिक्षण लॉस एंजेल्स आणि न्यूयॉर्कमध्ये झालं वेंडेल फॅशन डिझाईन बरोबर पर्यावरण क्षेत्रात ही कार्यरत होतं. वेंडेल यांच्या मृत्यूमुळे फॅशन डिझाईन क्षेत्राला मोठा झटका बसला आहे. विविध प्रकारच्या डिझाईन बरोबर खास गोव्याच्या कुणबी साडीवर वेंडेल यांनी काम केलं होतं. वेंडेल यांनी  काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना आपल्या हाताने डिझाईन केलेली साडी  भेट म्हणून दिली होती. वेंडेल यांनी प्रामुख्याने, रेखा, दीपिका पदुकोण, मलायका अरोरा, फराह खान यांच्यासोबत डिझाईन क्षेत्रातलं काम केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या