JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Indian Idol फेम सायली कांबळेच्या हातावर लागली मेहंदी,समोर आले फोटो

Indian Idol फेम सायली कांबळेच्या हातावर लागली मेहंदी,समोर आले फोटो

‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) ची सेकंड रनर अप सायली कांबळे (Sayali Kamble) सतत चर्चेत असते. यावेळी ती आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सायली 24 एप्रिलला म्हणजेच परवा दिवशी लग्नबंधनात (Wedding) अडकणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 एप्रिल- ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) ची सेकंड रनर अप सायली कांबळे (Sayali Kamble) सतत चर्चेत असते. यावेळी ती आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सायली 24 एप्रिलला म्हणजेच परवा दिवशी लग्नबंधनात (Wedding) अडकणार आहे. गेल्या वर्षी 19 डिसेंबर रोजी तिचा प्रियकर धवलसोबत (Dhawal) तिने साखरपुडा उरकला होता. आणि आता हे दोघे लग्न करणार आहेत. दरम्यान आता सायलीच्या प्री वेडिंग फंक्शन्सना सुरुवात झाली आहे. आज सायलीच्या हातावर मेहेंदी लागली आहे.

सायली कांबळे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. सध्या सायली आपल्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. आज सायलीचा मेहेंदी समारंभ पार पडला. गायिकेने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून आपल्या मेहेंदीसोहळ्याची झलक शेअर केली आहे. सायलीने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मेहेंदीच्या कोनने सजवलेलं ताट ठेवण्यात आलं आहे. त्यांनतर तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या गर्ल गॅंगसोबत धम्माल करताना दिसून येत आहे.

लग्नापूर्वी सायली आणि धवलने प्री-वेडिंग फोटोशूटही केले आहे. जे तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांसोबत शेअर केले आहे. इतकंच नव्हे तर अलीकडेच एका मुलाखतीत सायलीने आपल्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाल्याचा खुलासा करत लग्नाची तारीख सांगितली होती.

Indian Idol 12 हा सीजन खूपच लोकप्रिय ठरला होता. यातील प्रत्येक स्पर्धकाला एक विशेष ओळख मिळाली आहे. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे महाराष्ट्राची सायली कांबळे होय. सायलीला शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. इंडियन आयडॉल संपल्यानंतरसुद्धा सायली कांबळे सतत चर्चेत असते. गेली अनेक दिवस ती विदेश दौऱ्यावर होती. त्यामुळे ती प्रचंड चर्चेत होती. तसेच सध्या ती सोनी वाहिनीवरील एका रिएलिटी शोमध्ये मेंटॉरच्या भूमिकेत दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या