JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Taarak Mehta Ka Ooltah Chashma : प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार; नवीन तारक मेहता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Taarak Mehta Ka Ooltah Chashma : प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार; नवीन तारक मेहता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

लोकप्रिय ‘तारक मेहका का उल्टा चष्मा’ या मालिकेची सध्या प्रचंड चर्चा आहे. निर्मात्यांनी शैलेश लोढा यांच्या जागी दुसरा अभिनेता घेतल्याची सध्या चर्चा सुरु आहे.

जाहिरात

Taarak Mehta Ka Ooltah Chashma

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 ऑगस्ट : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. इतक्या वर्षणापासून हि मालिका आजही प्रेक्षकांना आवडते. पण आता या मालिकेतील मधून एक एक कलाकार बाहेर पडत आहे. त्यामुळे निर्मात्यांचं चांगलचं धाबं दणाणलं होतं. मालिकेतील दयाबेन अर्थात दिशा वकानीने  देखील गेल्या काही वर्षांपूर्वी मालिकेतून एक्झिट घेतली आहे. ती परत येणार की नाही, याबाबत काहीच स्पष्टता नाही. पण तेव्हापासून मालिकेतील कलाकारांची एक एक गळती सुरु झाली आहे. पाहिलं दयाबेन, टप्पू यांनी मालिका सोडली होती. त्यात काही दिवसांपूर्वीच मालिकेतील लोकप्रिय तारक मेहता यांनीही मालिकेतून एक्झिट घेतली. तारक मेहता यांची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वीमालिका सोडत असल्याचं जाहीर केल्यानं प्रेक्षकांना आणखी एक मोठा धक्का बसला होता. शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यापासून नवीन तारक मेहता कोण साकारणार याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. निर्मातेही योग्य व्यक्तीच्या शोधात होते. पण आता प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण लवकरच नवीन तर्क मेहता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. निर्माते असित मोदी यांनी शैलेश लोढा यांच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लावल्याचंही बोललं जात आहे. आता असं म्हटलं जात आहे की, या भूमिकेसाठी निर्मात्यांनी जैनीराज राजपुरोहितशी बोलणं केलं आहे. मात्र यात कितपत तथ्य आहे याची काही कल्पना नाही. हेही वाचा - Ranbir kapoor : आलिया ऐजवी रणबीरलाच लागलेत डोहाळे? मारला साऊथ इंडियन जेवणावर ताव; फोटो व्हायरल काही मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, ‘तारक मेहता’च्या भूमिकेसाठी अभिनेता जैनराज राजपुरोहितला कास्ट करण्यात आले आहे. जेव्हा एका हिंदी वेबसाइटने शोचे निर्माते असित मोदी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यास स्पष्टपणे नकार दिला. यात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. शैलेश यांच्या जागी अद्याप कोणाचाच विचार केला नसल्याचे सांगितले. जसा नवीन अभिनेता मिळेल तेव्हा सर्वांना सांगितले जाईल असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

जैनीराज राजपुरोहित यांनी अनेक मोठे टीव्ही शो केले आहेत. ‘बालिका वधू’, ‘लागी तुझसे लगन’, ‘मिले जब हम तुम’ यांसारख्या सर्व लोकप्रिय मालिकांमध्ये तुम्ही त्याला पाहिले आहे. एवढेच नाही तर त्याने काही चित्रपटांमध्येही काम केले. यामध्ये अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड’ आणि ‘आउटसोर्स सलाम वैंकी’ यांचा समावेश आहे. विनोदी भूमिकांमध्ये तो जीव ओततो. गेल्या १४ वर्षांपासून शैलेश लोढा हे या मालिकेत काम करत होते. पण  मलैकेचे निर्माते  यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे त्यांनी मालिका सोडल्याचे  होते. पण आता नवीन तारक मेहतांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या