मुंबई, 1 सप्टेंबर: करण जोहर होस्ट करत असलेला लोकप्रिय शो म्हणजे ‘कॉफी विथ करण’. या शोचा नवा सीझन ‘कॉफी विथ करण 7’ सध्या अनेकांचं लक्ष वेधत असून या शोमधून विविध खुलासे होत असलेले पहायला मिळत आहे. नुकताच या सीझनचा नववा एपिसोड प्रदर्शित झाला. या भागात अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री क्रिती सेननने हजेरी लावत अनेक धमाल, मस्ती, खुलासे केले. यावेळी टायगरनं बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. करण जोहरने टायगर आणि क्रितीला काही प्रश्न विचारले. यावेळी त्यानं एक प्रश्न अमिताभ यांच्याविषयी विचारलेला पहायला मिळाला. करण विचारलं होतं की, अशी कोणती अभिनेत्री आहे जिने अमिताभ यांच्या आईची आणि प्रेमिकाची भूमिका निभावली?. यावर टायगरने म्हटलं की, ‘रेखा मॅम’. टायगरच्या या उत्तरानं करणने आपली छातीच पकडलेली पहायला मिळाली. करणची रिअॅक्शन पाहिल्यावर आपलं काहीतरी चुकलं असल्याचं टायगरच्या लक्षात आलं. तर क्रितीनं म्हटलं की, मला याविषयी फारशी खात्री नाही. हेही वाचा - Vidya Balan ने बाथरुममधला ‘तो’ व्हिडीओ केला शेअर, चाहते म्हणाले… या प्रश्नाचं उत्तर सांगताना करणने म्हटलं की, वहिदा रहमानने त्याची आई आणि मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. याशिवाय राखी आणि शर्मिला टागोर यांनीही भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिलेली पहायला मिळालं. त्यांची अनेक गुपितं या भागामध्ये उघड झाल्याची दिसली. दरम्यान, डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणारा लोकप्रिय शो म्हणजे ‘कॉफी विथ करण’. कॉफी विथ करणचा सातवा सीझन सुरु झाल्यापासून शोविषयी सोशल मीडियावर अनेक बातम्या फिरत आहे. सेलिब्रेटींविषयी अनेक किस्से, खुलासे, धमाल, मस्ती पहायला मिळत आहे. याशिवाय अनेक गुपितं देखील उघड झालेली पहायला मिळतायेत. अनेक लोकप्रिय कलाकारांनी आत्तापर्यंत या सीझनला हजेरी लावली असून पुढच्या एपिसोडच्या कलाकारांची चर्चा सुरु आहे.