JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / चाललंय काय? गश्मीर,मनस्वीनंतर आता 'या'अभिनेत्याने सोडली IMLIE मालिका

चाललंय काय? गश्मीर,मनस्वीनंतर आता 'या'अभिनेत्याने सोडली IMLIE मालिका

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘इमली’ (Imali) सतत चर्चेत असते. कधी नवनवीन ट्विस्टमुळे तर कधी कलाकारांमुळे ही मालिका प्रसिद्धी मिळवत असते. त्यामुळेच ‘इमली’ टीआरपी यादीत नेहमीच टॉप 5 मध्ये स्थान मिळवते .

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 एप्रिल-   छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘इमली’   ( IMLIE )  सतत चर्चेत असते. कधी नवनवीन ट्विस्टमुळे तर कधी कलाकारांमुळे ही मालिका प्रसिद्धी मिळवत असते. त्यामुळेच ‘इमली’ टीआरपी यादीत नेहमीच टॉप 5 मध्ये स्थान मिळवते . ही मालिका कधी दुसऱ्या तर कधी तिसऱ्या क्रमांकावर दिसून येते. सध्या ‘इमली’मध्ये सुंबूल तौकीर (Sumbul Touqeer) आणि फहमन खान  (Fahmaan Khan)  मुख्य भूमिकेत दिसत आहेत. एकीकडे शोमध्ये येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवत असताना दुसरीकडे काही कलाकार शो सोडणार असल्याची चिंता निर्मात्यांना लागली आहे.सुरुवातीला मालिकेमध्ये ‘आदित्य कुमार त्रिपाठी’ची मुख्य भूमिका मराठी अभिनेता गश्मीर महाजनीने  (Gashmeer Mahajani)  साकारली होती. त्याने अचानक मालिका सोडत सर्वानांच धक्का दिला होता. त्यानंतर मालिनीची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखही गायब झाली होती. दरम्यान आता आणखी एक अभिनेता मालिका सोडत असल्याची माहिती समोर आली आहे. मराठमोळ्या गश्मीर-मयुरीनंतर गश्मीरच्या जागी आलेल्या मनस्वी वशिष्ठनेही मालिका सोडली आहे. मनस्वीने मालिका सोडत प्रेक्षकांना चकित केलं होतं. आणि आता आणखी एका कलाकाराने ‘इमली’चा निरोप घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. या मालिकेतून आता अभिनेता अरहम अब्बासीने काढता पाय घेतल्याचं समोर म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की निर्माते हळूहळू आदित्य त्रिपाठीचं पात्र मालिकेतून काढून टाकणार आहेत.आता मालिका संपूर्ण आर्यन आणि इमलीवर केंद्रित असेल.इतकंच नव्हे तर आदित्यच्या कुटुंबातील सदस्यांनाही शोमधून बाजूला केले जात आहे. मनस्वीने शो सोडल्यानंतर आदित्य कुमार त्रिपाठी परदेशात शिफ्ट झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत हळूहळू आदित्यच्या कुटुंबाचा ट्रॅकही मालिकेतून संपत चालला आहे.

संबंधित बातम्या

नुकतंच सोशल मीडियावर अरहम अब्बासीची एक पोस्ट व्हायरल होत आहे. अरहमने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, - ‘हा प्रवास कधी संपला हे मला माहित नाही. कठीण होतं पण तुमच्या प्रेमाने ते सोपं केलं. निशांत त्रिपाठीला इतकं प्रेम देणाऱ्या तुम्हा सर्वांचे आभार. काही उणिवा राहिल्या असतील किंवा चुका झाल्या असतील तर माफ करा. मात्र ही कथा इथेच संपते. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो आणि कृपया ‘इमली’ पाहात राहा’. असं म्हणत या अभिनेत्याने मालिकेचा निरोप घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या